Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अतृप्त ओळी

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/29/2022 - 00:01
  • Read more about अतृप्त ओळी
  • 11 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4073 views
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .

लढवय्या

Submitted by कर्नलतपस्वी on Tue, 06/28/2022 - 09:42
  • Read more about लढवय्या
  • Log in or register to post comments
  • 885 views
मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी राजकुमार मी बाबांचा हे साम्राज्य ही माझेच आहे मी फोन उचलला नाही मी भेटही दिली नाही इंद्रापदा करता सुद्धा कधी दंगा केला नाही काकांनी मज समजावले सिंहासन,बाळा तुझेच आहे सुखेनैव राज्य कर तू आता मी तुझ्याच बरोबर आहे सर्वत्र सुखशांती आहे काकांनी मज सांगीतले जा बाळा तू झोपी मी जागा आहे उघडले खडकन डोळे मग सैरभैर मी झालो सेनेने बंड केले, हे मज कुणी सांगीतलेही नाही मग लढता लढता काका दुर निघूनी गेले कधी अभिमन्यू झाला माझा हे मलाच उमगले नाही मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी...... २८-६-२०२२ कृपया हल्के घ्या, मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मागे कुठलाच उद

फोटोवारी-२०२२

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 06/27/2022 - 15:34
  • Read more about फोटोवारी-२०२२
  • 11 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3724 views

(दळण नसलेल्या गिरणीवर)

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 06/27/2022 - 11:17
  • Read more about (दळण नसलेल्या गिरणीवर)
  • 9 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 5023 views
पेरणा http://misalpav.com/node/50380 कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून *दळण नसलेल्या गिरणीवर* जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच कंटाळून नागमोडी होऊन जातात टोमणे आणि कुचकट बोलणे जेव्हा नित्याच होतं तेव्हा वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं बदललेला गिरणी चालक आणि त्याच्या भूलथापांचा मारा सततची कुचंबणा, अन अवहेलना आणि नको नकोसे असमान वाटप वाटेवर नाराजी पसरवते भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज पुन्हा एकदा गर्जना करतो अन नाराज वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते अतिरेक झाला की असेच

वळण नसलेल्या वाटेवर

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 06/27/2022 - 10:43
  • Read more about वळण नसलेल्या वाटेवर
  • 7 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 3782 views
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२

राष्ट्रहीतासाठी.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 06/26/2022 - 22:24
  • Read more about राष्ट्रहीतासाठी.
  • 25 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 5586 views
चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी! पेट्रोल ११०, डिझेल ९५, सीएनजी ९०, सहण करा! राष्ट्रहीतासाठी! भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे, मरती जनता सहण करा! राष्ट्रहीतासाठी! निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी, शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा! राष्ट्रहीतासाठी! पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा! राष्ट्रहीतासाठी! आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!

मैत्री स्वत:शी- मैत्री सर्वांशी

Submitted by मार्गी on Sun, 06/26/2022 - 20:11
✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट ✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट ✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी ✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल ✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन ✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही ✪ आपण काय करू शकतो? सर्वांना नमस्कार. पुण्यामध्ये केंद्र असलेल्या "मैत्री" संस्थेच्या कामाला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने झालेल्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला. मैत्रीमधल्या जुन्या मित्रांना भेटता आलं. मैत्रीचं काम आणखी थोडं समजून घेता आलं.
  • Read more about मैत्री स्वत:शी- मैत्री सर्वांशी
  • Log in or register to post comments
  • 1129 views

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

Submitted by पराग१२२६३ on Sat, 06/25/2022 - 19:44
टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.
  • Read more about विंबल्डनचे सेंटर कोर्ट
  • 2 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 1883 views

'विचित्रगड' किल्ले रोहिडा

Submitted by चक्कर_बंडा on Fri, 06/24/2022 - 20:06
  • Read more about 'विचित्रगड' किल्ले रोहिडा
  • 13 प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
  • 4767 views

कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)

Submitted by Vivek Phatak on Fri, 06/24/2022 - 15:00
  • Read more about कोळेश्वर ट्रेक १९.०९.२१ (जांभळी गावाकडून)
  • Log in or register to post comments
  • 11 views

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 248
  • पान 249
  • पान 250
  • पान 251
  • पान 252
  • पान 253
  • पान 254
  • पान 255
  • पान 256
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »
Subscribe to

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com