पंधरा ऒगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला अन भारताच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.
शेकडो राज्ये, संस्थाने, जमाती, भाषा, संस्कृती,जाती, धर्म.....वगैरे वगैरे ह्यांच्यात गुरुफ़टलेल्या भारताचे कळत नकळत का होईना ब्रिटिश काळात एकप्रकारचे CONGLOMERISATION झाले. अन १५ ऒगस्ट ला एक ब-यापैकी एकसंध भारत जन्माला आला.
जस जसा काळ सरत गेला तस तशी भारतात एकसंधता येत गेली. भाषावार प्रांत रचना ,एकच चलन, काश्मीर काहि अंशी वगळता आंतर्देशीय स्थलांतर, व्यापार हा नवीन स्वरूपात विकसित होत गेला. भारतातल्या कुठल्याही भागात लोकांना स्थावर मालमत्ता खरेदी करता येउ लागली.
उद्योगांची वाढ झाली. मिळालेल्या लोकशाहीत नवनवीन योजना राबवल्या गेल्या. त्याचा फ़ायदा /तोटा समाजातल्या सर्वच स्तरांना झाला.
ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वेच्या जाळ्यामुळे आपसुकच व्यापार उद्योगाला चालना मिळाली. दुर पल्ल्याची प्रवासी वाहतुक शक्य झाली.
ब्रिटिशांनी बांधलेले रस्ते, पुल, बंदरे ह्यांचा वापर करता येऊन दळ्ण वळण, आंतर्राष्ट्रीय आयात निर्यात शक्य झाली.
ह्या आधी नव्हती असे नाही परंतु काम करण्याची नवीन प्रणाली, वा एक पध्दत लागु झाली.
उच्च समाजाला का असेना इंग्रजीची ओळख झाली. एक सामायिक शिक्षण पध्दती अस्तित्वात आली.
सैन्य दले , वायुसेना व नेव्ही ह्या उपलब्ध झाल्य़ा.
ब्रिटिश भारतात असण्याचा मुख्य फ़ायदा म्हणजे येथे लोकशाहीची मुहुर्त मेढ रचली गेली.
ब्रिटिश राज्यवटी नंतर भारताला मिळालेल्या काहि आयत्या संधी
१. लोकशाहीची मुहुर्तमेढ
२. रस्ते, पुल, बंदरे, कारखाने ,
३. इंग्रजी चा प्रसार
४. शिक्षण पध्दती
५. शासकीय कामकाज पध्दती
६. सैन्य दले-
७. रेल्वे
अन सर्वात महत्वाचे म्हणजे
एकसंध भारत
येत्या पंधरा तारखेला ब्रिटिश भारतातून जाऊन ६५ वर्षे पुर्ण होतील
तर प्रश्न असा आहे की गेल्या ६५ वर्षात भारताने किती प्रगती केली?
त्यामध्ये किती भर घातली?
तसेच ब्रिटिश जर भारतात आले नसते तर आज भारत कुठल्या परिस्थितीत असता?
भारताने खरोखरच ह्या उपलब्ध संधीचा कितपत फ़ायदा करून घेतला?
गेल्या ६५ वर्षात ह्या साधनांमध्ये किती वाढ केली? रस्ते, रेल्वे ह्यांची कितपत वाढ झाली?
त्या ऐवजी ब्रिटिश अजुन ६५वर्षे भारतात राहीले असते तर बरे झाले असते का?
भारतातला भ्रष्टाचार कमी झाला असता का ?
एक प्रकारची शिस्त समाजाला लागली असती का?
धर्म-जाती ह्याचे राजकारण संपुन एकसंध समाज अस्तित्वात आला असता का?
अन मुख्य म्हणजे भारताची अजुन जास्त प्रगती झाली असती का?
महत्वाचे : ह्या लेखात ब्रिटिश राजवटीचे कुठलेही समर्थन करण्याच प्रयत्न नसून मुख्य विचार हा ब्रिटिश राजवट सापेक्ष सध्याच्या भारताच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा आहे.
वाचने
7799
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी काय म्हणतो अभिज्ञा, आपल्या
२०१४ नंतर सगळ सुरळीत होणार...
ब्रिटीशर्स अजून असते तर
गल्लत!
In reply to ब्रिटीशर्स अजून असते तर by रणजित चितळे
सॉरी साहेब
In reply to गल्लत! by पिवळा डांबिस
बर्याच गोष्टी आहेत...
मनोबांच्या प्रतिसादाशी
अर्थात ब्रिटीशांच्या या
जंगलाचे नियम !!
.
काही...
In reply to . by मन१
हम्म्म
म्हणजेच...
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
ते आता
In reply to म्हणजेच... by मन१
वा वा...
In reply to ते आता by परिकथेतील राजकुमार
सुधारणार नाही हा परा कधीही.
In reply to वा वा... by मन१
क्काय...? इंग्रजी राज्य
एकंदर ब्रिटीश चांगले होते
आत्याबाईंना मिश्या असत्या तर..
अजून एक दोन
In reply to आत्याबाईंना मिश्या असत्या तर.. by चिगो
राजीव ऎवजी सन्जय गान्धि पुढे
In reply to अजून एक दोन by किणकिनाट
धाग्याची शम्भरी
In reply to राजीव ऎवजी सन्जय गान्धि पुढे by कवटी
माझे २ पैसे.....
In reply to आत्याबाईंना मिश्या असत्या तर.. by चिगो
हे कदाचित वाजपेयीना भाजपला
जयंत नारळीकरानी "
इथे ब्रिटिश राजवट आली नसती तर
दुस-या महायुध्दात बेचिराख व
सहमत आहे.
In reply to दुस-या महायुध्दात बेचिराख व by विजुभाऊ
आत्याबाईला मिश्या असत्या तर
अशी आहे होय ती म्हण..
In reply to आत्याबाईला मिश्या असत्या तर by रेवती
अगदी!!!
In reply to आत्याबाईला मिश्या असत्या तर by रेवती
स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी
सहज जिंकलो गेलो
In reply to स्वातंत्र्य मिळालं त्या क्षणी by गवि
सुंदर प्रतिसाद!
In reply to सहज जिंकलो गेलो by मन१