स्वातंत्र्याची सकाळ
भोवताली सर्वत्र अंधार आहे,सगळीकडे त्याचाच संचार आहे
कोण कुणाच रक्त पितोय,कुणी आपलेच खिसे भरतोय
ज्याला काही जमत नाही तो मात्र हताशपणे बघतोय
पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
अंदाधुंदी माजली आहे,जो तो मनाला येईल तसे वागतोय
स्वतः बरबटलेला आहे पण दुसऱ्याच्या शुद्धतेचा पुरावा मागतोय
यातून पुढे काय साध्य होणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे..................
एकेकाळी सोन्याचा धूर होता,आज दारिद्र्याचा पूर आहे
बासष्ट वर्षे झाली तरी लक्ष्य अजून खूपच दूर आहे
ज्या दिशेला धावतोय ती बरोबर का चूक ते कसे कळणार आहे?
कारण भोवताली सर्वत्र अंधार आहे.......
मिसळपाव