Skip to main content

होस्टेलमधील पहिला दिवस.

लेखक जोयबोय
Published on सोमवार, 25/06/2012
सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो. तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते. तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते. त्यातले दोघे माझ्याच वर्गातले. एकाने होस्टेलच्या लॉबीत पहाते चार वाजता एका फासावर लटकलेल्या बाईला पाहीले. बिचारा लघूशंकेकरता टॉयलेट्कडे चालाला होता. तिथेच बेशुद्ध पडला.बाकीच्या पोरांनि त्याला सकाळि उठउन काय झाले ते विचार्ले तर त्याने झालेला प्रकार सांगितला. मग काय् अफवेचे एकुन पेवच फुटले. रोज नवीन नवीन घटना ऐकायला येवु लागल्या. एकाला तर रात्रि बाई हाका मारत असल्याचा भास झाला. त्याची सुद्धा टरकली. हे सर्व माहीत असुनही मी होस्टेलला गेलो. तो माझा पहिला दिवस होता.कॉलेजचे ते सुरुवातीचे दिवस होते. इमारत तशी मोठी होती. रात्री एकदम शांतता असाय्ची. मि, माझा रूमपार्टनर धिरज आनी दोन मित्र असे एकुन चार जन आमच्या रूममधे झोपायचे ठरले. चौघात मि नविन होतो. मग काय धिरजला हुक्की आली आनी त्याने भुताटकीचे किस्से सांगायला चालु केले. रात्रीचे साधारण ११:३० झाले होते. त्याच्या एकापेक्षा एक किस्स्यांनी एकदे माझी टरकत होती. तसे मी रूमच्या बाहेर येउन पाहीले तर सर्वत्र एकदम सन्नाटा. कोणिच लॉबीत दिसत नव्हते. कशे दिसनार. ६०पैकी ४च रूममधील मुले आली होती. पण मला वाटले भुताट्कीमुळे असतील सगळे आपापल्या खोल्यात. झोपन्यापुर्वी लघवी करुन यावी असे ठरवले होते. तसे टॉयलेट आणि माझ्या रूममधे १५ पावलांचे अंतर असेल. पन आज तेच १५ किमि वाटत होते. कायकरावे काही कळेना. बाकीचे मित्रपण सोबत यायला तयार नाही. धिरज तर बोलला खिडकितुन कर. बाहेर जाउ नको. पण मन राजी नव्हते. भितीतर जबर्दस्त. सगळे भुते एकदम आठवायला लागली. शेवटी देवाचे नाव घेउन एकटा निघालो टॉयलेटकडे. टॉयलेटमधेपन अंधार! भितभितच शू करायला लागलो, तोच पाठीवरती कुनीतरी हात ठेवला आणि एकडे कळजाचा ठोका चुकला. सगळे अंग थरथरर्त होते. मेलो आता. मागे वळुन बघायचि हिम्मत होईना. घशाल कोरड पडली आवाज निघता निघेना . तोच मागुन हस न्याचा आवाज आला. आवाज परिचयाचा होता. तो हात आणि आवाज होता महाशय धिरज यांचा. साल्याने जबर्दस्त घेतली होती माझी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3808
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

एकाच गोष्टिला वेगवेगळि नावे देण्याचे काहि प्रयोजन समजले नाहि.... लघुशंका, लघवी आणि शू.... तुमच्या लिखाणावरुन त्याचे लॉजीक असे असावे : म्हणजे मित्राला (किंवा इतरांना) लागते ति "लघुशंका" आपल्याला लागली आहे ह्याची फक्त भावना/जाणिव ति "लघवी" आणि आपण 'अ‍ॅक्च्युअली' करतो ति "शू" (कृपया ह.घे. ह्यात कुठलाहि चावटपणा वा घाणेड्रेपणाचा हेतु नाहि, केवळ एक गमंत :) ) बाकि हे हि क्लीअर केले ते एक बरे >>>> तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे लिहीत रहा ;)

In reply to by उदय के'सागर

@लघुशंका, लघवी आणि शू... > :-D शू मेकर उदयाचला, काय बुद्धी चालली पण तुझी.मेलो हसुन हसुन :-D समांतर -भयकथाकार स्पांडु तुला टफ आहे रे बाबा अता ;-)

>>>शेवटी देवाचे नाव घेउन एकटा निघालो टॉयलेटकडे. टॉयलेटमधेपन अंधार! भितभितच शू करायला लागलो, तोच पाठीवरती कुनीतरी हात ठेवला आणि एकडे कळजाचा ठोका चुकला. सगळे अंग थरथरर्त होते. मेलो आता. मागे वळुन बघायचि हिम्मत होईना. घशाल कोरड पडली आवाज निघता निघेना . प्रचंड विनोदी किस्सा....अर्थात पूर्ण वाचला नाही. पण वरिल वाक्यांवरुन अदांज आला.:smile:

बाकी डिप्लोमाला होता कुठं तुम्ही ? कारण महाराष्ट्रात अशी पॉलिटेक्निक फार कमी आहेत स्मशानाजवळ असलेली.