Skip to main content

जगी हा खास वेड्यांचा पसारा..

लेखक नानबा यांनी बुधवार, 02/01/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्‍यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की. मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार.

घडवून आण मग बोल…

लेखक आर्णव यांनी बुधवार, 02/01/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
जग बदलण्याची जिद्ध तुझी, कुठेतरी मनातच आहे खोल. आधी स्वतःला बदल मित्रा, घडवून आण मग बोल. विचारांच्या गर्दीत वाहून जाताना, तुझे कोणते, तुलाच कळेनात. तुलाच बदलावं लागणार आहे राजा कळून देखील का बर वळेना निर्धाराचे शीड प्रयत्नांची नाव आणि नावाड्या तूच अनमोल पैलपार जाणे आहे घडवून आण मग बोल पायाभरणी कल्पनेची क्रियेचा कळस मग देईलच यश तुला देव पण आळसाच्या दलदलीतून वाट आहे पाय जमिनीवर जपून ठेव प्रत्येक तुझ्या कृत्यामागे विचार तुझे असोत सखोल अरे पूर्ण होईल, तू सुरु तरी कर घडवून आण मग बोल तुझ्यासारख्यांनी इथे कल्पनेतच रमायचं त्यात हरवून, त्या साकारण्या आधीच दमायच न केलेल्या प्रयत्नातून न मिळा

तेजाळलेल्या रात्रीचे क्षण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 02/01/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस तू? त्या तेजाळलेल्या रात्रीचे क्षण अजूनही रेंगाळतायत, तुझी लाल चुटुक टिकली माझ्या दंडावर घट्ट आहे, निसटलेला एक चुकार केस चिकटलाय त्या उशीवर, लांबसडक... कपाळावर तुझ्या ओठांची महिरपी मोहर, घरभर तुझ्या गजऱ्याचा मोगराच दाटलाय, अन् हातांच्या तळव्यावर तुझ्या गालांचा सायस्पर्श घुटमळतोय, ----- पण तू कुठे आहेस? ----- तू इतकी जवळ आहेस, कि तुला पाहू तरी कसे? जरा दूर जाशील तर पाहता येईल ना.. जराशी दूर हो... पाहू तरी तेजाळलेल्या रात्री मोगरा माळलेला गुलाब कसा दिसतो.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०१/०१/२०१३)
काव्यरस

मालवण नगरवाचन मंदीर वाचक स्पर्धा

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 02/01/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
विषय: श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्‍या बुधवार दिनांक २६-१२-२०१२. स्थळ: मालवण नगरवाचन मंदीर. मालवण नगरवाचन मंदीर प्रथम ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाची ओळख करून दिली. श्री. संजय शिंदे त्यांचे भाषण नीटनेटके आणि छोटेसे आणि त्यामुळे हवेहवेसे वाटणारे होते.

एकटेपणा.....

लेखक रणजीत देशमुख यांनी बुधवार, 02/01/2013 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"एकटेपणा"...हा किती ओळ्खीचा वाटतो... रोज रात्री मला अन्धारात येऊन भेटतो.. मग आथवते ती शान्तता..जी सतत माझ्या सोबत असते... अनधारात चालू असते किड्यान्ची किरकिर.. तेवध्यात ऐकू येतो कोणीतरी बोलल्याचा आवाज... आजू बाजूला बघितल्यास तिथे कोणीही नसत.. सोबत असतो तोच तो "एकटेपणा".........(१) रात्री-बेरात्री पडलेल असते ते चान्दण... किती सुरेख दिसते त्यात,बागेतल्या फुलान्ची मान्डणी.. मध्येच येते ती वारयाची झुळुक..जी कानात काही सान्गू इछिते.. पण काहीच बोलत नाही माझ्याशी रुसल्यागत.. न बोलता निघून जाण्याने मी दुखावतो... परत ती माझ्याशी बोलण्याची वाट पाहतो..

तुम्ही खोटंच बोलता : एक निष्कर्ष. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 02/01/2013 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, तुम्ही खोटं बोलता का ? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतांना मजा आली. समाजात वावरतांना आपण खोटं बोलत असतो, हे माहिती असूनही 'सत्यं वद' ची हाकाटी पीटतांना पाहून लोकांची गंमत वाटते. संशोधनात एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यापर्यंत काही गृहितकं असली पाहिजेत म्हणजे निष्कर्षाकडे पोहचता येते, किंवा निष्कर्षकाडे जाण्याची एक पायवाट तयार होते असे म्हटल्या जाते. काही एक गृहितं संशोधकाने गृहितं धरलीच पाहिजेत.

मालोर्का

लेखक केदार-मिसळपाव यांनी बुधवार, 02/01/2013 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर-डिसेम्बर महिन्याचे दिवस होते. जर्मनीत थंडीने काकडून गेलो होतो. तापमान 0 डिग्री च्या आसपास आसवे. अगदी वैतागाल्यासारखे झालेले. त्यामुळे जवळपास जास्त खर्चिक नसलेला पण थोडे उबदार हवामान असलेल्या आणि कमीत कमी वेळेचा प्रवास असणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात घोळत होता. आणि अचानक एक छान वीक एंड ऑफ सिझन ऑफर सापडली. स्पेन देशातील भूमध्य समुद्रात असणाऱ्या मालोर्का बेटावर ३ दिवस दोन वेळचे खाणे आणि विमान प्रवासासह एकूण किंमत प्रवासी १९० युरो. मग काय पटकन बुकिंग केले आणि सपत्निक निघालो. माझ्या गावापासून न्युर्नबर्ग विमानतळावर येवून पोहोचलो.

.............नियती.........

लेखक प्रेमवेडा यांनी मंगळवार, 01/01/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपासुन मनात एक प्रश्न सलत राहीला कधी याचे उत्तर मिळेल का? हेच विचारत राहीला उत्तर शोधण्यासाठी माझे मन सदैव झगडत राहीले अनेक उत्तरे मिळवुन सुद्धा ते उत्तर शोधतच राहीले यश आले अखेर 'नेमके' उत्तर मिळवायला पण् हेच नेमके मान्य नव्हते नियतीला अनेक समिकरणे जुळवुन कसेबसे उत्तर मिळवले पण् 'नियती'च ती! तिने सारे प्रश्नच बदलून टाकले.........!!!!!!!!!