Skip to main content

घर पाहतो बांधून : १

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी मंगळवार, 27/09/2022 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
गावी स्वतःचं, स्वतः घडवलेलं एक घर असावं अशी खूप इच्छा होती. घरांबद्दल मी खूप वाचत आलो. अगदी अलिकडचं उदा. द्यायचं तर नंदा खर्‍यांच्या नागपूरच्या घराबद्दल त्यांच्या 'ऐवजी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात वाचलं. त्याआधी माधव आचवलांपासून ते गणेश मतकरी अशा अनेक लोकांचे घराबद्दलचे लेखन मी वाचलं आहे. काहींची अगदी किशोरवयीन उत्साहाने कात्रणंही जपून ठेवली आहेत. कोल्हापुरात असताना माझ्या वास्तव्याशेजारी एक सुंदर बंगला होता. मी त्या बंगल्याच्या बागेकडे, कुंपणावर सोडलेल्या वेलींकडे जातायेता आवर्जून खूप वेळ पाहत असे. मालकांचे नाव गर्दे अंकल. गर्दे अंकल नामांकित आर्किटेक्ट.

विजेची गोष्ट ८: डेव्हिची ठिणगी - एडिस्वानचा दिवा, प्लॅंक ला दिसला मार्ग नवा

लेखक अनिकेत कवठेकर यांनी सोमवार, 26/09/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
समईची वात जळते, स्वतः:ला तेलात भिजवून घेते आणि जळत जळत आजूबाजूच्या अंधाराला जाळते. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या अवतीभवती अंधाराला फिरकू देत नाही. तेच मशालीतल्या वातीचं, पणतीतल्या, मेणबत्तीतल्या वातीचं.. हे स्वतः जळणं, स्वतः: ला त्रास करून घेऊन आजूबाजूला आनंद देणं तसं सृष्टीत सर्वत्रच दिसतं.. स्वतः:चं सारं अग्नीला वाहून, इदं न मम म्हणजे हे माझं नाही असं म्हणत स्वतः कडचं उत्तम समाजाला देणं आणि त्या निःस्वार्थात स्वतः उजळून जाणं यापेक्षा एखादा माणूस स्वतः चं अधिक चांगलं असं काय करू शकतो?

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

लेखक राहुल यांनी सोमवार, 26/09/2022 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते. विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/09/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.

सेक्स फॉर रेकॉर्डस

लेखक राहुल यांनी रविवार, 25/09/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ९

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 25/09/2022 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र:- कुडियारसू . गांधी आणि पेरियार यांच्यात काय फरक होता? शेवटी दोघांनाही तर अस्पृश्यांची मुक्तीच करायची होती. अरुंधती रॉय आणि इतर अनेक लेखकांनी गांधी-आंबेडकर जोडीवर असेच प्रश्न मांडले. पाहीले तर कुठलाही वैज्ञानिक विचार किंवा 'दोन अधिक दोन चार' असे विचार माननार्या माणसाला गांधींमध्ये दोष दिसू शकतो.