Skip to main content

तमिळनाडूचा इतिहास- शेवटचा भाग .

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 02/10/2022 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
. पेरियार आणी राजाजी. आधी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीपासूनच पेरियारांमध्ये काँग्रेसबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणेतरांचा मुद्दा घेऊन जस्टीस पार्टी सत्तेत असतानाही पेरियार काँग्रेसमध्ये होते, खादीचा प्रचार करत होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणणारे केशव पिल्लई काँग्रेस सोडून गेले पण पेरियार काँग्रेसमध्येच राहिले.

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 01/10/2022 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.

नपुंसकत्व

लेखक राहुल यांनी शनिवार, 01/10/2022 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
नपुंसकत्व पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी गुरुवार, 29/09/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ? विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी बुधवार, 28/09/2022 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

मेषपात्र

लेखक मालविका यांनी बुधवार, 28/09/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
Being मेष मी आणि श्रीनिवास योगायोगाने मेष रासवाले. त्यामुळे अनेकदा दोघांचं अनेक बाबतीत एकमत होत. मेष असण्याचे फायदे तोटे दोघानाही भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टीवर भावनिक रित्या व्यक्त होण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करतो. त्यामुळे कधीतरी आम्ही फारच कोरडे आहोत का असा विचार येतो. फेसबुक वरचे reels बघताना किंवा अगदी एखादा शो म्हणा, पिक्चर म्हणा, आम्ही असं डोकं बाजूला ठेवून बघूच शकत नाही. हे अस कुठे असतं का? अस वाटत राहतं.

महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 27/09/2022 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली. हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले. पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी.

रविवार भटकंती - सायकल वर तिकोना पेठ - एक तिडंबन

लेखक Yogesh Sawant यांनी मंगळवार, 27/09/2022 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा - उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची (पण यावेळी एनफिल्ड वर) माझी जुनी सायकल अजूनही चांगली चालते तरीसुद्धा मला डोंगरात चालवता येईल अशी मरीन सॅन क्यूएनटिन १ सायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरच्या डोंगरावर चालवून आलो. Mountain Biking हा फोटो त्या दिवशीच काढलेला आहे. तुम्ही आज बघताय. Mountain Biking हा फोटो आधी कधीतरी काढलेला आहे.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी मंगळवार, 27/09/2022 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी 'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही.