Skip to main content

हाडाचा सापळा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 24/09/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
हाडाचा सापळा (गूढकथा) काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात. पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.      मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते.

वेडा वेडा पाऊस..

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 24/09/2022 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा वेडा पाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस? काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस.. छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला, होतं असं चुकून, कळावं ना पावसाला? वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला. म्हणून भिजले, नको ना रे भलता अर्थ लावूस! भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना? बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना? घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना? म्हणून थांबले, नको की रे भलता अर्थ लावूस! बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं? कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं? घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं! म्हणून बिलगले, नको हो भलता अर्थ लावूस! तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा
काव्यरस

मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर

लेखक राहुल यांनी शनिवार, 24/09/2022 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत. -मिपा व्यवस्थापन स्त्रीसाठी सेक्स डॉल असते का ? पुरुषाला स्त्री सेक्स डॉल असते. यात हुबेहूब रबरी स्त्री असते, जिच्याशी सेक्स करता येतो. तसेच हुबेहूब पुरूष रबरी पुतळा असतो ज्यात ताठरता असलेले लिंग/डिल्डो असतो. योनिमार्गात प्रवेशित करून स्त्री 'विमन ऑन टॉप' या आसनात सेक्स करू शकते. हे डॉल २०० किलो पर्यंत वजन सहन करू शकते.

(उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 23/09/2022 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा) माझी जुनी मोटारसायकल आता बदलायला आली होती म्हणून मग मलाच चालवता येईल अशी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५० एक्स मोटारसायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली . एक सहज कोरीगडावर चक्कर मारून येऊ अस ठरवून घरातून सकाळी ७.१५ ला बाहेर पडलो.

बाल गोष्टी हव्या आहेत.

लेखक विनिता००२ यांनी शुक्रवार, 23/09/2022 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आम्ही एक नवीन मराठी बाल साहित्याला वाहिलेले यूट्यूब चॅनेल सुरु करतो आहोत. आपण बाल गोष्टी / साहित्य लिहीत असाल......वयोगट ४ ते १०....तर आपण आपले स्वलिखित साहित्य' आम्हांला देऊ शकता. निवड झालेल्या गोष्टींचे अ‍ॅनिमेटेड स्टोरी बुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळणार नाही. पण चॅनेलवर लेखक म्हणून तुम्हांला क्रेडीट दिले जाईल. ) अट एकच....साहित्य पेपरबुक / मासिकात/ ब्लॉगवर प्रकाशित असले तरी चालेल, पण कुठल्या ही प्रकारे व्हिडीओ / ऑडिओ स्वरुपात प्रकाशित झालेले नको. कथेसाठी काही सूचना - कथा छोट्या असाव्यात.

एका अवलियाची भटकंती- किक स्कूटर

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/09/2022 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी या लेखात आपल्याला एका भटक्या अवलियाची ओळख करून देणार आहे. जगभर अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत,वाचत,ऐकत असतो. पण असा अवलिया आपला "बॉय नेक्स्ट डोअर" असेल तर? माझा ट्रेकिंग मधील जुना परिचित वर्तकनगर ठाण्याचा रहिवासी राजेश खांडेकर हा असाच एका भटक्या. राजेशचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. पण साधारण १९९० पासून राजेशच्या सायकल मोहीम सुरु झाल्या. ठाणे वज्रेश्वरी -१२० कि.मी. ठाणे नाशिक -५२० कि.मी.

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

लेखक Trump यांनी गुरुवार, 22/09/2022 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.

लद्दाख

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 22/09/2022 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूशास्त्राच्या अंकलिपीची पाने इथली उलटी रंगभारले पहाड, अवघड रस्त्याची वेलांटी रण वाळूचे पायतळी अन् हिमकण माथ्यावरती किती विरोधाभास पचवुनी फुलते इथली सृष्टी रंग नभाचे प्राशुनी वाहे निवळशंख हे पाणी रौद्र नि प्रशांत उभय रसांचे मिश्रण केले कोणी (नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 22/09/2022 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

अलेक्सा झाssssली ...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 22/09/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून. एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.