ती रात्र !
टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं SS हं, घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षित घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतिक्रिया होती. नकळत त्याच्या तोंडून एक शिवी निघाली, ही सुद्धा एक सहज प्रतिक्रियाच. मुळात या असल्या वातावरणात एकट्याने एकच चाक असलेल्या बाइकची सोबत करत बसल्यावर कुणीही वैतागेलच. त्यात पंक्चर काढून आणायला गेलेला राक्या अजून परतला नव्हता.
" साला, काय सगळे पंक्चर काढणारे आज संपावर गेले काय?" मनातल्या मनात बडबडून कंटाळलेला निल्या आता उघड संताप व्यक्त करत होता.
मिसळपाव
२६ जानेवारी १९८७!
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो.