चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)
“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्या आवाजात.
“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?एंड्युरो ३
जिममधे विकास सरांनी विचारेपर्यन्त "एन्ड्युरो३" स्पर्धेमधे भाग घेइन असं कधी वाटलच नव्हतं. एन्ड्युरो३ विषयी खूप ऐकुन होतो. गेले ८-१० महिने निखिल शहा आणि पुणे रनिंग ग्रुपमुळे धावण्याची आवड निर्माण झाली होती. स्टॅमिनाही बर्यापैकी वाढला होता. या ग्रुपची ओळखही विकासनीच करुन दिली होती. तेव्हापासुन १० वेळातरी अर्धमॅरॅथॉन (२१किमी) धावलो होतो. एकदा मॅरॅथॉन आयोजनाचा अनुभवही घेतला होता.
निखिल सायकलिंग्,रनिंग, ट्रेकींगमध्ये खूपच माहीर आहे. बर्याच स्पर्धा त्याने जिंकल्याही आहेत. पण त्याचे खरे वेड आहे ते या सगळ्या गोष्टींच इतरांना वेड लावण्यात.
व्हॅलेंटाईन डे स्पेशल चॉकलेट केक
पॅनकेकसाठी साहित्यः
मैदा - १ कप
पिठीसाखर - ४ चमचे
अंडी - २
दुध - १/२ कप
बेकिंग पावडर - १ टि-स्पुन
बटर - २ चमचे (पातळ करुन)
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिठ - १/२ छोटा चमचा
क्रिम आईसिंगसाठी साहित्यः
फ्रेश क्रिम - १ कप
कोको पावडर - १/२ कप
पिठीसाखर - १/२ कप
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
सजावटीसाठी:
चॉकलेट फ्लेक्स - १ कप
चॉकलेट ट्रफल्स - ४-५
पिठीसाखर - १ चमचा
कृती:
१. पॅनकेक साठी सर्वात आधी बटर वितळवुन घ्यावे.
२. एका बाउल मधे मैदा, पिठीसाखर, मिठ व बेकिंग पावडर मिक्स करावे.
दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (२/२)
प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही?
उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं!
प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का?
उ. झाकिर हुसेनः गेली १० वर्षे सोडली तर मी गायकांबरोबर भरपूर वाजवलं आहे. पं. ओंकारनाथ ठाकूर ते पं. जसराज या तीन पिढ्यांमधील जवळजवळ प्रत्येक विख्यात गायकाची मी साथ केलेली आहे. कंठसंगीत हाच आपल्या परंपरेचा गाभा आहे. तोच तर आपला खरा खजिना आहे.
प्रेम दुसरं काय...!!!
yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही.
मी सतत प्रेमात पडते.! हो ना .. कारण पडणं हीच एक अशी गोष्ट आहे जी झाल्यावरच कळते. बर आणि प्रेमात पडण्याचे माझे ठोकताळे , नियम (so called criteria)असं काही नाही.
उत्सव
मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी
आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन् काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन् लडीवाळ जराशा
कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ
आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.
जयश्री अंबासकर
काव्यरस
उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...
मित्रांनो,
काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला.
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.
Raging Bull - Disturb करणारा चित्रपट
Raging Bull - हा अजुन एक Martin Scorsese चा चित्रपट. १९८० साली आलेला आणि आता so-called one of the greatest म्हणुन मानला गेलेला.
हा चित्रपट कथा सांगतो Jake LaMotta नावाच्या १९४०-५० मधल्या बॉक्सर ची. एका अतिशय आक्रमक, असुरक्षीत माणसाची who is run by animal insticts, jealousy , sexual desire. ही सत्यकथा आहे, जेक च्या आत्मचरित्रा वरुन घेतलेली. त्यामुळे थोडी सॉम्य झालीय ( स्वताबद्दल लिहिले आहे ना ).
चित्रपटाची सुरुवात १९६४ मधे जेक च्या बोलण्याच्या practice नी होते. ( तो एका पब मधे stand up comedy ) करत असतो.
शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता
अगदी नेहमीसारखेच
आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो
अगदी नेहमीसारखेच
कोणी किती गहरे असावे?
किती अलंकार शोधावे उपमांसाठी
किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी
कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी
कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी
न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे?
दरवेळेस मी इरेला येतो
तुला कागदावर उतरवायला सरसावतो
लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात
क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो
मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो
अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो
नेहमीसारखेच
.
.
आता पुन्हा मी भांबावलेला
पुन्हा नि:शब्द
ना
काव्यरस
मिसळपाव