Skip to main content

पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे...

लेखक चिम् चिम् मामा यांनी शुक्रवार, 10/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे आणि अमेरिकेत एक साम्य आहे... दोन्ही ठिकाणी तुम्ह्चे सारख्या पद्धतीने स्वागत होते.... How long you are planning to stay in US? What you are gonaa do here? तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते... आज कसे काय येणे केले...? कधी पर्यंत मुक्काम आहे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10572
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

In reply to by चिम् चिम् मामा

आपल्याला किंवा आपल्या 'लेखाला' नावे ठेवण्याचा उद्देश नाही पण हा खरोखर लेख होवू शकतो यावर तुमचा विश्वास आहे काय? आपण स्व:ता 'हा लेख उडवण्यात यावा' ही मागणी संपादकांकडे करावी ही विनंती. यातच आपले मोठेपण सामावलेले आहे.

In reply to by भरत कुलकर्णी

अगदी अगदी... लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही. (मूळ वाईचा असून, पुण्याबद्दलही जाज्वल्य अभिमान असणारा, आणि वरचे प्रश्न फक्त 'व्हिसा अधिकार्यांकडून' ऐकलेला, तरिही एक देश म्हणून अमेरिका आवडलेला) मी आहे ना..इथेच, पुण्यात.

In reply to by मी_आहे_ना

लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही. सहमत. एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.

In reply to by मी_आहे_ना

लेख(म्हणता येत असेल तर, नाहीतर ललित का काय ते) काही झेपला नाही. सहमत. एव्हढे विद्वत्ताप्रचुर लिखाण मिपाकरांच्या पचनी पडणे अवघड आहे.

कंपनीला घाइ झाल्यामुळे दोन महिन्यात दोन वेळा युएस व्हिसा रिजेक्ट झालेला (खरी उत्तरं दिल्यामुळे)

सुंदर व ओघवती लेखनशैली. एवढा लांबलचक लेख असूनही कुठेही कंटाळवाणा झाला नाही, हे विशेष. एकच सूचना करावीशी वाटते.. पुढच्या वेळी इतके मोठे लेख २-३ भागात टाकलेत तर जरा बरं होईल.

तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते... आज कसे काय येणे केले...? कधी पर्यंत मुक्काम आहे?
आपले घर- दार, शहर सोडून आधी लोकाच्या दारात बोंबलत जावेच कशाला ? हाटेलात रहावे की, आणि अगदी राजासारखे आदरातिथ्य करून घ्यावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इच्या मायला.. एकतर तुम्ही पाहुणे म्हणून येणार, त्यामुळे तुमची बडदास्त ठेवा. चांगलं-चुंगलं खायला प्यायला द्या.. तुमच्यासाठी वेळ काढा, तुमची करमणूक होईल असं आदरतिथ्य करा.. तुम्हाला फिरवा. बरं काही कमीजास्त झालंच तर तुमचे टोमणे खा.. सांगितलंय कुणी !? जा, र्‍हावा की हाटीलात नी करा जे करायचंय ते.. आपलं ढाण्ण ऽ ऽ कण अनुमोदन हाये पराला ! :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

कधी नव्हे ते पराशी सहमत व्हावे लागत आहे. काय हो चिमा, नाही आवडत पुण्यात यायला तर कोणी आमंत्रण दिलय का? आणि दिलच कोणी तर तुम्हाला घटनेनं 'नाही' म्हणायचा अधिकार दिलाय की! तिथं मोह सुटत नाही अन् दुसर्‍याला नावं ठेवतायत. ही नावं ठेवायची पद्धत तुमच्या गावची वाटतं?

जेव्हा जेव्हा "बोंबलत" हा शब्दप्रयोग करतात तेव्हा मला का कोण जाणे "सुक्या बोंबलांची ", "पाट्यावर दाबुन मग तांदळाच्या पिठात तळलेल्या ओल्या बोंबलांची", "भाजलेले सुके बोंबील", "सुक्या/ओल्या बोंबलांच्या कालवणाची" जबरदस्त आठवण येते

In reply to by इरसाल

असे मन मारु नका इरसाल शेठ. चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चेन्नईमध्ये एखादी महाराष्ट्रीयन बाई ठेवा स्वयंपाकाला. आम्ही केरळात पडिक आहोत. प्राब्लेम काय साल नाय व्हनार झालं...... हा सल्ला सोकाजीरावांना उपयोगी पडेलसे वाटते.

आणि आणखी एक साम्य पुणे आणि अमेरिकेत आहे की. दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य) लोकांना त्यांच्या ठिकाणाविषयी अतोनात अभिमान असतो आणि आपले ठिकाण सोडून जगात दुसरे काहीच नाही असे वाटत असते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दोन्ही ठिकाणच्या (बहुसंख्य) लोकांना त्यांच्या ठिकाणाविषयी अतोनात अभिमान असतो आणि आपले ठिकाण सोडून जगात दुसरे काहीच नाही असे वाटत असते.
बहुसंख्य उत्तर/दक्षिण भारतीयांना असेच वाटत असते. या बाबतीत पुणेकर अग्रेसर वगैरे नाहीत.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

कूपमंडूक म्हणालो असतो, पण तुम्ही वटवाघूळ आहात!! ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या ठिकाणाबद्दल अभिमान असतो.....एक मुंबई सोडली तर.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दोन्ही कडे बाहेरील व्यक्ती त्या त्या ठिकाणांना नावे ठेवतात आणि तरी तेथे स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात अथवा होतात. :-) फरक इतकाचः अमेरीकेत परमनंट रेसिडेंन्सीनंतर नॅचरलाईझ्ड अमेरीकन नागरीक होता येते. पुण्यात तुम्ही परमनंट रेसिडंट होऊ शकाल पण नॅचरलाईझ्ड पुणेकर होणे शक्य आहे असे वाटत नाही! ;)

तसेच जर तुम्ही पुण्यात कोणाच्या घरी गेलात तरी तुम्हाला अशाच प्रश्नान्ना सामोरे जावे लागते... आज कसे काय येणे केले...? कधी पर्यंत मुक्काम आहे? अस्सं? मी तर ह प्रश्न ठाण्यात देखील ऐकला आहे. ग्लोबलायझेशन इफ्फेक्ट ... दुसरं काय?

माहितीबद्दल धन्यवाद. :) मला वाटलं काही तुलनात्मक अभ्यास, काही गृहितके, काही संशोधन, काही निष्कर्ष. काही साम्य-भेद असलेला एखादा अभ्यासपूर्ण लेख आहे की काय ? लेख सुरु झाला आणि लगेच संपला इतकेच बाकी काही नाही. बाकी, तुम्ही पब्लिकचं काही मनावर घेऊ नका. लिहित चला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१. तेच ना. एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर, त्यांच्या कमेंट्स मनावरती का घ्याव्यात हे एक न उलगडलेले कोडे आहे.

In reply to by बॅटमॅन

'मनावर' असा शब्द आहे होय तो. मी भलतेच काहितरी वाचले आणि अनावर झालो. असो...

In reply to by बॅटमॅन

एवढ्याशा पुण्यातील इतकेसे पुणेकर, 'इतकेसे' या शब्दात मला काही तरी 'संखेचा' बोध होतो. त्याऐवजी दुसरा शब्द नै वापरता येणार का ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पार्टन्स पण इतकेसेच होते म्हणतात. बाकी चालू द्या..

In reply to by परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म. ३०० मध्ये तीनशे पुणेकर* असते तर काय झाले असते असा एक रंजक विचार मनात चालू आहे. कुणीतरी कल्पनाविस्तार करायला मदत करा रे. * म्हणजे आत्ताचे, ते पण शक्य असल्यास सदाशिवपेठी पुणेकर, बाजीप्रभूंच्या काळातील नाही .

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा धड कमब्याक देखील नव्हता पराशेठ :) असो. बाकी या उपमेचा एकूण इतिहास पाहता मूलनिवासी शक्तींना पाचारण करावे म्हणतोय ;) (मूलनिवासी हीरो) बॅटमॅन.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तलवार चालवली म्हटल्यावर दुसर कोण काय बोलणार. शेवटी त्यांची सही बघा दुधारी हटवलेली आहे. ;)

उथळ धाग्याला प्रतिसाद फार!

अजूनही MH 12 प्रभागातील 'त्या' अस्मिता टिकून आहेत, अन कितीही उथळ धागे काढले तरी तितक्याच कडव्या अन कडवट प्रतिक्रीया येतात हे पाहून करमणूक झाली. 'सारेगम'मधे अवधूत गुप्ते सलील कुलकर्णींना 'एमेच्च बारा' म्हणून जे काय खिजवतो त्यावर टिपिकल एमेच्च बारा चेहरा (चेहर्‍यावर एमेच बारा वाजलेले) झालेला सलील आठवला अगदी.. रच्याकने : हाटेलीत जायची ऐपत सग्ळ्यांचीच असते हो. इथे प्रॉब्लेम असा आहे, ­पुण्यात आलात तर तुम्ही हॉटेलात रहा, पण आम्ही पुण्याबाहेर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मात्र 'गावाकडचा' वगैरे पाहुणचार 'आपुलकीने' करा अशी अपेक्षा दिसते... (अनुभवी) गोपाळ

In reply to by आनंदी गोपाळ

अजूनही MH 12 प्रभागातील 'त्या' अस्मिता टिकून आहेत, अन कितीही उथळ धागे काढले तरी तितक्याच कडव्या अन कडवट प्रतिक्रीया येतात हे पाहून करमणूक झाली.
अगदी अगदी. बाकी करमणूक टॅक्सफ्री होते हेवेसांनल:) जामोप्यास्टाईल प्रतिक्रिया इथे देणे सुरू केले तर कित्ती कित्ती मज्जा येईल असे वाटून डोळे पाणावले ;)
रच्याकने : हाटेलीत जायची ऐपत सग्ळ्यांचीच असते हो. इथे प्रॉब्लेम असा आहे, ­पुण्यात आलात तर तुम्ही हॉटेलात रहा, पण आम्ही पुण्याबाहेर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मात्र 'गावाकडचा' वगैरे पाहुणचार 'आपुलकीने' करा अशी अपेक्षा दिसते...
अगदी अगदी. या काडीशी आपलं कडेशी बाडिस. रच्याकने: फेबुवर ही कम्युनिटी पाहिली, हहहहहहपुवा झाली नाव वाचून - "MH-12=आम्ही बाराचे" :D :P

In reply to by बॅटमॅन

जामोप्यांची स्टाईल मारायची गरज नाही हो! ते स्वतः आहेत की मिपावर? बाकी ब्याटम्यान, तुम्ही अन ते पुणेरी वटवाघूळ एकच का हो? (दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..) पन तरिही या धाग्यावर 'काय तो धागा आन काय ते पर्तीसाद!' अस्ली परस्तीती हाये!

In reply to by आनंदी गोपाळ

माहिती आहे हो जामोप्या इथे आहेत ते! बाकी पुणेरी वटवाघूळ आणि अस्मादिक हे एक नव्हेत. ते पुण्याचे, तर मी गॉथमचा :)

In reply to by आनंदी गोपाळ

बाकी ब्याटम्यान, तुम्ही अन ते पुणेरी वटवाघूळ एकच का हो? (दोघांत ब्याट आहे म्हणुन विचारले..)
नाही. माझी इतर नावे स्वाक्षरीत दिली आहेत. त्यात "बॅटमॅन" या नावाचा समावेश नाही :) आणि मी "पुण्याचे वटवाघूळ" आहे "पुणेरी वटवाघूळ" नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे चे पुणेरी झाले, क्षमस्व! बाकी माझी आय्डी नेक्ष्ट संस्थळावर 'दारूडा साप' अशी घेणारे मी. (मी दारू प्यालेल्या सापासारखा नेहेमी सरळ चालतो म्हणून.)

हे असे काही पुणेकर अमेरिकेत गेल्यामुळे झाले ही काही अमेरिकन्स पुण्यात आल्यामुळे झाले , यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

किमान शब्दात कमाल आकर्षित करणारा धागा , सध्या अश्यात मीपा वर पहिला नाही... आपण चिम् चिम् मामा चे फॅन झालो राव ! बाकी पुणेकरांच्या विषयी बोलण्यची काही सोय राहिली नाही :)