किनारे
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल]
मज दोन आसवांना हुलकावता न आले
हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले
कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी
उपटून यातनांचे तण काढता न आले
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले
मरणासवे कितीदा फसवे करार झाले
जगणे नकोच होते, पण टाळता न आले
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली
प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे
कवटाळले उराशी, भिरकावता न आले
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता
दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (१/२)
आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत".
उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात.
नवा भगवा दहशतवाद??
नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली.
म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली.
(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या .
काव्यरस
पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?
"चल ए छोटूss त्या तीन नंबरवर फडका मार... ए बब्बन, त्या दोन पोरी केव्हाच्या बसल्यात बे, ऑर्डर घे ना बेटा त्यांची... हा बोलो साब..??",
"एक चिकन हंडी... पार्सल", मी मेनूकार्डवर नजर न टाकताच ऑर्डर केली.
"बस..."
बस? च्यायला ह्याला काय पडलीय आम्ही एक डिश मागवू नाहीतर दहा.. गुमान ऑर्डर घे आणि निघ ना.. पण त्याचीही काही चूक नव्हती. आज वर्षाची अखेरची रात्र होती, ३१ डिसेंबर.. सारे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील चायनीजच्या गाड्या देखील हाऊसफु्ल होत्या. लोक फॅमिलीच्या फॅमिली घेऊन घराबाहेर जेवायला पडले होते. तिथे माझ्या एका चिकन हंडीच्या ऑर्डरवर त्याची प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित नव्हती.
खजूराची चटणी ..(पाणी पुरीसाठी)
साहित्य:
१) खजूर (बिया काढून)
२) चिंच (जेवढे खजूर घ्याल त्याच्या १/४, जास्त आंबट नको)
३) गूळ (खजूराच्या १/२)
४) चाविपूरत मीठ आणि लाल तिखट
५) चिमूटभर हिंग (हिंगाने चटणीला छान वास येतो)
कृती -
वरील सर्व साहित्य एका पसरट भांड्यात घेवून पाण्याबरोबर जवळपास २०-२५ minutes मंद आचेवर शिजवावे
जेणेकरुन खजूर आणि चिंच एकदम मऊ शिजून निघतील.
थंड झाल्यानंतर mixer मधून बारीक करून घ्यावे...आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळावे .
झाली खजुराची चटणी तयार.
जास्त झाली तरी Refrigerator मध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते सॉस- जॅम सारखी.
पाणी पुरी, भेळ पुरीच्या गाड्यावर, गोड चटणी म्हणून वापरतात ती हीच चटणी असते
कच्च्या पपईची कोशींबीर / सॅलेड
साहित्यः
१. किसलेला कच्चा पपई - १ मध्यम (चित्रात दाखवल्यापेक्षा अजुन बारीक किसता/चीरता आला तर उत्तम)
२. १/२ लिंबाचा रस
३. वरिल लिंबाचीच किसलेली साल - १/२ चमचा
४. सुख्या लाल मिरच्या - २/३ (भरडसर वाटुन) किंवा ओल्या लाल मिरच्या - २ बारिक चीरुन
५. खारे शेंगदाणे मुठभर (सालं काढुन १/२ करुन)
६. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध
७. कोथिंबीर / पुदिना एच्छिक (बारिक चीरुन)
कॄती:
१.आयुष्य राजयोगी (तरही गझल)
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयवी - जयश्री अंबासकर
काव्यरस
बुद्धी आणि मन….
बुद्धी आणि मन….
आपल्या अंतरी नेहमीच अस घडत असत
बुद्धी आणि मनाचं बरयाचदा पटत नसत
एकदा असंच त्याचं पटेनास झाल
या ना त्या कारणावरून सारखच भांडण होवू लागल
भांडता भांडता बुद्धीने घेतला पवित्रा
नि दुषणे लावत बोलू लागली मनाशी
असा कसा रे तू नेहमी वागतोस ..
स्वप्नांच्या दुनियेतच का तू राहतोस
स्वप्न आणि सत्य यातील फरक तुला कधी कळणार
जादूनगरीतून अखेर बाहेर तू कधी येणार
मान्य..
मिसळपाव