आज दहीहंडीच्या दिवशी मुंबईत हंडीचा आधुनिक अवतार पाहायला मिळाला. पारंपारिक हंडी ही रस्त्याच्या दोन बाजुंना परस्परासमोर उभ्या असलेल्या इमारती वा खांब यांच्यावर दोरखंडाने बांधुन उंच टांगलेली असते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत बांधकामासाठी वापरल्या जाणार्या उंच क्रेनचा वापर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हंडी टांगण्यासाठी केलेला पाहिला. क्रेनच्या टोकाला लटकलेली हंडी, वर सोनेरी छत्र व ध्वज, पताका यांची सजावट या कल्पकतेला मनोमन दाद द्यावीशी वाटली.
मला फोटो टिपायला जमले नाही, पण माझ्या मागोमाग आलेल्या माझ्या साहेबांनी त्यांच्या ब्लॅकबेरीवर ही हंडी टिपली आणि मला धाडली. साहेब असावा तर असा :)


वाचने
2798
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
साहेबाला धाग्याची लिंक पाठवली
कोठेतरी सन्नी लिओन पण येणार
जसं काही अप्सराच येणार
In reply to कोठेतरी सन्नी लिओन पण येणार by पक पक पक
मेख
आत्ताच टीव्हीवर बघीतले... एका
In reply to मेख by तिमा
हंडी फोडणार्याला काही भरपुर
In reply to आत्ताच टीव्हीवर बघीतले... एका by टवाळ कार्टा
हो.
In reply to हंडी फोडणार्याला काही भरपुर by शिल्पा ब
साहेब असावा तर असा
क्रेन हंडी,
दहिहंडी..... धांगडधिंगा
हो.. दहीहंडीचा आधुनिक अवतार.