Skip to main content

वाट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 15/03/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी. येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं. आणि मग तो आला की भरपूर गर्दी. ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे. येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा. ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची. एक दिवस तार आली. तो गेला होता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी --------------------------------------------------------------------- मोठ्या कष्टानी फोटो टाकलेले आहेत.

गणपतीला जानवे कोणी घातले ?

लेखक शरद यांनी गुरुवार, 14/03/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे.

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस

" डराव डराव -"

लेखक विदेश यांनी गुरुवार, 14/03/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
टकमक टकमक बघत बघत डोळे मोठे आणखी करत येता जाता डराव डराव का ओरडता बेडूकराव तुमच्या उड्या टुणूक टुणूक चपळाईची मस्त चुणूक अंगणातल्या डबक्यात किती करता बाहेर आत पाण्यात जास्त भिजू नका डराव डराव गर्जू नका सर्दी पडसे झाल्यावर खोकत बसता काठावर औषध कधी घेत नाही डराव डराव थांबत नाही झोपू द्या ना शांत आम्हाला नाहीतर सांगीन नांव आईला !

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 12/03/2013 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते.

माहेरचा अव्हेर!

लेखक आजानुकर्ण यांनी मंगळवार, 12/03/2013 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते.

अनपेक्षित भाग ३

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/03/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले. (भाग २) तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकादाने जर कमी झाले.

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस