चाकवतची ताकातली पातळ भाजी
रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही चाकवतची ताकातली पातळ भाजी!! चाकवत ऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते.
साहित्यः एक जुडी चाकवत, अर्धा लीटर दह्याचे ताक, दोन-तीन चमचे बेसन, आठ-दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा.
क्रुती: प्रथम चाकवत निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा. दही मिक्सरला घुसळून घ्यावे. चाकवत आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे.
मिसळपाव