माझी कंपुबाजी
रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .
तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ...
प्रश्न?
खुप दिवसाने आज आरशात स्वतःला न्याहाळले.चेहरावरच्या सुरकुत्या खुप काही सांगून गेल्या. संसारात रमताना विसरलेल्या आठवणी जागवून गेल्या. डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळात माझे मी पण दडपले होत. ते शोधताना डोळ्यातुन एक स्वप्न पटकन निसटून गेल होत. नात्याची अनेक रूपे जगताना स्वताला कधी जगले ते आठ्वु लागले. दाट काळ्या मोकळ्या केसातुन तो एक केस पांढरा स्वतःची अनुभूती करवून देऊ लागला. भरलेल्या घरात असुनही का हि एकटेपणाची सल जाणवली. डोळ्यात हजारो स्वप्न असताना शून्यात गेलेली ती नजर आठवली. कधी घेतला होता मी मोकळा श्वास, कधी स्वताला शोधण्याचा हा केविलवाणा ध्यास. आहे सर्वाची मी, पण माझे असे कोण?
मसाल्यातील पदार्थ्-काळी मिरी तयार कशी करतात.
हा लेख कोणत्या प्रकारात टंकावा हे समजेना.स्वयंपाकाशी संबंधित असल्याने शेवटी पाककृती विभागात दिला.
जाणकारांनी महिती दिल्यास पुढे योग्य त्या प्रकारात टंकता येईल.तर असो.
हा मिरीचा वेल.आंबा,फणस,नारळ,सुपारी अश्या झाडांवर हा वेल चढवतात.
हे मिरीचे घोस.
हि घोसापासून वेगळी काढलेली मिरी.

झुक झुक गाडी -(बालकविता)
मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया -
दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,
दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी -
हिरवी निशाणी दाखवली
दादाने कुकशिटी वाजवली -
भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !
धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी -
जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?
इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -
भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !
सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -
छान छान आवाज गाडीचा
गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा ,
आपल्या तीन चकरा झाल्या
सगळे तयारीत रहा..
फिर काहे दर्द जगाओ
तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे.
पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला?
आणखी एक टायटॅनिक-2
भाग पहिला
सफर सुरु होऊन तीन तास होण्याच्या आतच अचानक जहाजाला भूकंप झाल्यासारखा जोरदार धक्का बसला.. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इटलीमधीलच जिलिओ बेट समूहांजवळून जात असताना हार्ड ग्रानाईटच्या एका दगडाने जहाजाचा तळ खरवडून काढला . दगडाने आपले काम चोख केले.जहाजाच्या तळाला एकशे साठ फुट लांबीचे भगदाड पडले .पर्यटकांना आपल्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी असला काही अनुभव येईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नसणार.
भीषण दुष्काळ...
गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी
जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत,
हिरवाई जरासुध्दा नाही.
लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार
म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ?
ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी.
थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली.
म्हणाली ऐव्हढच आहे पाणी,
ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला.
तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही.
ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका
नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही.
सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला
आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला.
हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली
पाण्यासाठी तिची वणवण म
मोजमापं आणि त्रुटी - २
या लेखाचा दुसरा भाग मला चौदा मार्चला, म्हणजे पाय दिनाला प्रसिद्ध करायचा होता. इतर कामांत गुंतलेलो असल्यामुळे थोडा उशीर झाला. आता तुम्ही म्हणाल की या मोजमापांचा आणि 'पाय' चा काय संबंध? उत्तर सोपं आहे. गेल्या लेखात मी तीन आकृती दिल्या होत्या. त्यांच्यातल्या सरळ रेषेची लांबी आणि वक्राकाराची लांबी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं होतं. या गुणोत्तरातून पाय ची किंमतच अप्रत्यक्षपणे मोजली जात होती. कशी ते सांगतो.
पाय म्हणजे वर्तुळाचा परीघ भागिले व्यास. व्यास मोजणं सोपं आहे - कारण ती एक सरळ रेषा असते. वर्तुळाचा परीघ मोजणं मात्र सोपं नाही.
मिसळपाव