Skip to main content

कुठेतरी दुरवर

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 11/03/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुरवर जायचं आहे सावलीची सुद्धा आशा नाही पाय नेतील तिथवर चालायचं थांबतील तिथे थांबायचं......... वाटेत अनोळखी भेटतील जे जीवलग बनुन जातील पण जीवलग भेटून सुद्धा कधी अनोळखी बनुन राहतील......... रस्त्याच्या कडेला कधी विसावा म्हणून पडायचं पुन्हा ऊन वारा सोसत मात्र एकट्यान घडायचं.......... कुठेतरी दुरवर जाऊन एखाद्या वळणावर माग वळून पाहायचं कितीही दुरवर आलो तरीही तुझ्या मनात मात्र कायम राहायचं..... यशवंत

इमोशनल फुलांच्या देशा…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं. आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे. आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य. 40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय...

वेरूळः भाग १ (जैन लेणी)

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 11/03/2013 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबादला यायचा मुख्य उद्देशच वेरूळ आणि अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यांना भेट द्यायचा हाच होता. पैकी अजिंठ्यावर लिहून झालेच, वाटेतल्या प्रवरासंगमच्या अद्भूत मंदिराबद्दल लिहिले गेले पण वेरूळवर लिहायला तसे काही सुचतच नसल्यामुळे इतके दिवस लिहायचे राहूनच गेले होते. एकंदरीत आमचा लेखनप्रवास आमच्या भटकंतीच्या अगदी उलटा सुलटा कसाही सुरु आहे. तर मी, किसन, धन्या आणि दिनेश पुण्यावरून निघालो. औरंगाबादच्या नगरफाट्यावर बिरुटे सर आमची वाट बघत थांबलेले होतेच. आता त्यांच्यासवेच आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत खुल्ताबादला औरंगजेबाची कबर पाहायला थांबलो.

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

काव्यरस

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०५ : स्नोमोबाइल सफारी, टामोक कँप आणि सामी तंबूतील ऑरोरा डिनर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 11/03/2013 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

फणसाच्या कुवर्याची भाजी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 11/03/2013 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
कुवरा म्हणजे कोवळा फणस. साहित्यः-१)कुवरा २)भिजवलेली तुरडाळ.(काळे वाटाणे,हिरवे वाटाणे,छोले,चवळी,शेंगदाणे पण घालू शकता.) ३)हळद. ४)मीठ ५)हिरवी मिरची.(उभी चिरलेली) ६)चवीपुरता गूळ. ७)खोबरेल तेल. ८)मोहरी(फोडणीसाठी) ९)बारीक चिरलेला कांदा.( optional) १०)खवलेले ओले खोबरे. कृती :-प्रथम कुवर्याच्या फोडी करून कमी पाण्यामध्ये क

बलात्कार ... स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

लेखक सप्पुभाई यांनी रविवार, 10/03/2013 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस विचार करत होतो, या विषयावर लिहावे की..नको... पण आजच्या वर्तमान पत्रात पुन्हा एकदा बातम्या वाचल्या... "जुहू मध्ये एका ३वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार" "नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार"... आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच.... या वासनान्ध राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही.... नुकताच दिल्लीतिल त्या काळ्या घटनेला एक महिना पूर्ण झाला... मेणबत्ती मोर्चा काढून किती आणि काय परिणाम होतो माला नाही माहीत...

दुधी-मोतिया खीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 10/03/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी साल व बीया काढून किसलेला दुधी १ लिटर दुध २-३ टेस्पून भिजवलेला साबुदाणा ३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टीस्पून बदामाचे काप १ टीस्पून पिस्त्याचे काप १/४ टीस्पून केशर १/२ टीस्पून वेलचीपूड १ टेस्पून साजुक तूप .

रताळ्याची खिर.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 10/03/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)रताळ्याच्या कापलेल्या फोडी.(चकत्या) २)चवीप्रमाणे गूळ. ३)चिमूटभर मीठ. ४)दोन मोठे चमचे भिजवलेला सबूदाणा. ५)नारळाचे दूध्.(जाड व पातळ) ६)वेलचीपूड. ७)साजूक तूप. कृती :-रताळ्याच्या फोडी पाणी घालून शिजत ठेवाव्या.थोड्या शिजल्या की त्यात भिजवलेला साबूदाणा घालावा. गूळ व मीठ घालून फोडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.फोडी शिजत आल्या की त्यात पातळ नारळाचे दूध घालावे व उकळी येऊ द्यावी.मग त्यात नारळाचे जाड दूध घालावे.उकळले कि त्यात वेलचीपूड व साजूक तूप घालून गॅस बंद करावा.थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करा.