तो आवाज आजही मला साद घालतो..!
"प्लॅटफॉर्म क्रमांक दो पे आनेवाली लोकल अंधेरी के लिये धीमी लोकल है..." एका महिला निवेदिकेचा गोड आवाज कानावर पडत होता. पण ज्या ट्रेनसाठी ही अनाऊंसमेंट होत होती त्या ट्रेनने मात्र केव्हाच स्टेशन सोडले होते. तीन-तीन भाषांमध्ये अनाऊंसमेंट करायच्या नादात हे असे होत असावे. पण निदान मग शेवटच्या वाक्यात आनेवालीचे जाने’वाली तरी करायचे. असो, कोणाला काय फरक पडतो. तसेही मुंबई लोकलने प्रवास करणार्यांमध्ये या बाईच्या आवाजावर विसंबून राहणारे मोजकेच असावे. आवाजावरून आठवले, या आवाजाच्या उगमाचा शोध कधी ना कधी तरी नक्की घ्यायचा होता मला.
मिसळपाव