नमस्कार मंडळी.सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा.
खरेतर आज मस्त गोडाची पाकृ टाकायला हवी होती.पण काय करणार काल पाहुण्यांनी व्हिजीट दिली आणि भात,
आमटी,भाजी थोडं थोडं उरलं.मग काय धनत्रयोदशीच्या दिवशी नाश्त्याला शीळासप्तमी साजरी केली.चला आता
साहित्य व पाककृतीकडे वळूया.
साहित्यः-दोन वाट्या उरलेला भात.
एक वाटी उरलेली आमटी.
भाजी उरली असल्यास.
एक वाटी बेसन्(पाहीजे असल्यास थोडे जास्त घेतले तरी चालेल)
अर्धी वाटी तांदुळाचे पीठ.
ज्वारीचे पीठ असल्यास.
मिरची पूड.
धणे-जिरे पूड.
मीठ.
तेल.
कृती:- वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे.थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवावे.खुप पातळ किंवा खुप घट्ट
भिजवू नये. एका प्लास्टीकवर थालिपीठ थापून घ्यावे.मध्ये तेल सोडण्यासाठी बोटानी भोक पाडावे.तव्यावर
तेल सोडून त्यावर थालिपीठ घालावे.बाजुने व भोक पडले त्यात तेल सोडावे.दोन्ही बाजुने खरपूस भाजून
घ्यावे व गरम गरम थालिपीठ लोण्याबरोबर खायला द्यावे.
काय मग मंडळी येताय न शिळासप्तमी साजरी करायला?
काय मग मंडळी येताय न शिळासप्तमी साजरी करायला?
वाचने
8945
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोणी
हाय...हाय...लै कातिल चव लागते
मस्तच.
In reply to हाय...हाय...लै कातिल चव लागते by अत्रुप्त आत्मा
वा!
दिवाळीच्या फराळाचे पदार्थ
चकल्या करून भाजणी संपलेली
In reply to दिवाळीच्या फराळाचे पदार्थ by रेवती
आता दिवाळीच्या भाजण्या घरात
In reply to दिवाळीच्या फराळाचे पदार्थ by रेवती
अहाहा..
जीवाला त्रास उगीच
मस्तच... लोण्याबरोबर काय...
मस्तच दिसतय.
वाह... एकदम मस्त
तीळ...
एक लंबर....बाकी "मराठा पराठा"
मस्त मस्त आहे हा प्रकार. फक्त
छान पाक्रु, मस्तच