आज सकाळी सकाळीच ही बातमी वाचनात आली आणि पुन्हा धर्माच्या नावाखाली चाललेल्या अघोरी प्रकारामुळे तळतळाट झाला.
सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी स्त्री डॉक्टरांनी अबॉरशन करायला नकार दिल्यामुळे मेली. अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर अबोर्शन करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्याने हरतर्हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (किंवा धर्माच्या नावाखाली लोकांनी) आणखी एक बळी घेतला. शेवटी लग्नबाह्य संबध ठेवल्याच्या संशयावरून बाईला दगडाने ठेचून मारणारे काय, नवरा मेला म्हणून त्याच्या बायकोला जिवंत जाळणारे काय आणि हे 'तथाकथित' डॉक्टर काय. सगळे एकाच माळेचे मणी.
मधे एकदा एक वाक्य वाचलेलं आठवलं 'नीतिमत्ता धर्माशिवाय असू शकते. पण धर्म नीतिमत्तेशिवाय असूच शकत नाही'. मागे एकदा अमेरिकेतील एका पाहणीत २०% लोकं कोणत्याही धर्माशी निगडीत नसल्याचं दिसून आलं. आणि ही टक्केवारी वाढतेय हे वाचून थोडं बरं वाटलं. अर्थात कोणत्याही धर्माशी निगडीत नसणे आणि कोणत्याही धर्माच्या लोकांबद्धल इन्डिफरंट असणे हया वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. धर्माची आणि कायद्याची सरमिसळ होऊ न देणं हे इतकं अवघड का आहे 'गॉड नोज'!
वाचने
2516
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रचंड संताप आणणारी घटना!
मला वाटतं इथे ही बाई भारतीय
In reply to प्रचंड संताप आणणारी घटना! by एस
+१
In reply to मला वाटतं इथे ही बाई भारतीय by मराठे
त्यांनी वेगळा विचार केला असता
In reply to मला वाटतं इथे ही बाई भारतीय by मराठे
आहे अवांतर तरी ...
In reply to प्रचंड संताप आणणारी घटना! by एस
वरील काही प्रतिसाद वाचून ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांच्यासाठी
In reply to आहे अवांतर तरी ... by सुनील
इष्टापत्ती?
अयोग्य
थोडे अस्थानी वाटले
आणखी एक
भारतात करता येतो
In reply to आणखी एक by पुण्याचे वटवाघूळ
अतिशय दुर्दैवी घटना .