टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव
✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो
✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक
✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे
✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल
सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल.
मिसळपाव