वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
नमस्कारास वेचावें नलगे
नमस्कारास कष्टावें नलगे
नमस्कारास कांहींच नलगे
उपकरण सामग्री. (४/६/२२)
आपल्या देशात आज ही खेडे गावांत रस्त्यातून येता जाता अनोळखी माणसाला ही लोक स्मित करून ,राम-राम, जय रामजी की म्हणतात नमस्कार करतात. आपण ही आई, वडील, गुरुजन आणि वरिष्ठांना नमस्कार करतो. पण समर्थ म्हणतात लहान मोठे अनोळखी सर्वांनाच नमस्कार केल्याने आपले काहीच जात नाही. ज्या गोष्टीसाठी पै ही लागत नाही ती करण्यात कंजूषी कारायची गरज नाही.
मिसळपाव