Skip to main content

पेशवाई"

Published on शुक्रवार, 22/02/2013
पेशवाई" एक आठवण खूप म्हणजे खुप दिवस झाले. पुण्यात सदाशिव पेठ पोस्ट ऑफिस जवळ एक छोटे खानी उपहार गृह होते. उपहार गृहाचे नाव "पेशवाई" त्या हॉटेल ची खासियत म्हणजे "मटार उसळ" अप्रतिम चवदार उसळ असायची त्या हॉटेल मध्ये अर्थात बाकीचे पण मराठी पदार्थ असायचे पण त्या काळी प्रत्येकाची मोनोपॉली ठरलेली असायची वडा म्हटला की प्रभाचा..मिसळ. बेडेकर वा वैद्यांची. लहानसे उपहार गृह होते कोप~यात एक नोकर रोज ताज्या मटारचा ढीग सोलत बसलेला असायचा. एकदा वेटरला रेसिपी विचारली तर नारळाची खव व नारळाच्या दुधाचा वापर करीत असे त्यामुळे उसळीस छान चव यायची. मटार उसळ ब्रेड स्लाइस व चहा मस्त नाश्ता व्हायचा .. जुन्या पद्धतींचे लाकडी काउंटर व खुर्चीवर बसलेले वयस्कर मालक.. कानाला यंत्र लावलेले असायचे.बहुतेक कमी ऐकू येत असावे. काउंटर लहानच होते पण त्याच्या काचेखाली अतिशय वळणार अक्षरात काही सुभाषिते व विनोद लिहिलेले होते. त्यातला एक मार्मिक विनोद आजही लक्षात आहे..तो असा लंडन च्या हित्रो विमान तळावर २ प्रवाशांचा संवाद प्रवासी..भारतात निघालो खरा पण गडबडीत घड्याळ घरीच विसरलो.. सह प्रवासी..काळजी करू नका भारतात नाही तरी लोक घड्याळ शोभेसाठीच मनगटावर बांधत असतात .. पुढे बहुतेक मालक देवाधरी गेले व एका नगर सेवकाने ते हॉटेल विकत घेतल्याचे कळले. काही दिवस चालले पण नंतर त्याने त्याचे बिअर बार मध्ये रुपांतर केले .. व त्या उपहार गृहाची पार रया गेली.. नंतर तो बार हि बंद पडला .. आता तेथे टोलेजंग इमारत होत आहे. असे कळते मटार उसळ खाण्याचा प्रसंग आला की पेशवाई ची याद येते
लेखनविषय:

वाचन संख्या 3472
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by नाना चेंगट

अगदी असंच वाटलं ! :) अजून एक रणधुमाळी सुरू करायची सोडून भावनिक धागा काढल्याबाबत णीषेद ! +D सदाशिवपेठेतल्या वाड्यात एक हॉटेल होते. आता नाव आठवत नाही पण खास मराठी चवदार पदार्थ खायला स्टेशनवरून चालत जाण्याएवढे छान होते. त्याला आम्ही दमबाजी हॉटेल म्हणायचो कारण "मासिक जेवण लावलेल्यांनी तिसरी भाजी मागू नये. अपमान होईल", "गिर्‍हाईकांनी आपली मुले आपण सांभाळणे त्यांचे कर्तव्य आहे" वगैरे दमबाजीयुक्त नोटीसा जागोजागी वाडाभर असत. पण तरीही पदार्थ चवदार असल्याने तिथे जायचा मोह आवरता येत नसे. काही वर्षांपूवी तो वाडा पाडून तेथे फ्लॅटवाली इमारत झाली आहे.

व त्या उपहार गृहाची पार रया गेली.. नंतर तो बार हि बंद पडला ..
बीयर बरोबर मटार उसळ दिली तर दुसरं काय होणार? ;)

पेशवाई अशी देखील बुडू शकते हे समजले!

मला त्याचं बियर बार रूपच आठवतंय. त्या बारचं नाव "बांसुरी". हणगं कुत्रं नसायचं त्या बारमध्ये. म्हणून कॉलेज-दिवसांमध्ये दुपारची बियर पिण्यासाठी ते सेफ ठिकाण होतं.

In reply to by आदूबाळ

म्हणून कॉलेज-दिवसांमध्ये दुपारची बियर पिण्यासाठी ते सेफ ठिकाण होतं.
आदूबाळ तुम्ही म.ए.सो. चे का हो ? कारण दुपारी तिथे पडीक फक्त त्याच कॉलेजची गँग असायची. बाकी, त्या 'आमदनी अठ्ठनी.. खर्चा रुपय्या' दिवसात 'पेशवाई' म्हणजे एक आधारच होता. इथे बर्‍याचदा बिअर बरोबर चक्क चक्क फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज.. फ्रेंच फ्राईज (सॉरी हान डाण्राव) सारखा चकणा फुकट दिला जायचा.