छगनलालांचे सापळे (भाग ५)
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197
त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी. आणि इतर इलेक्टॉनिक्स आयटेम आम्ही बाहेरून मागवत होतो.(लंगड्या घोड्यांकडून).
("लंगडे घोडे" ही औद्योगिक क्षेत्रातील एक वेगळीच जमात आहे.घोडा नाठाळ असेल तर त्याला एक लोढणे बांधतात.त्यामुळे घोडा जास्त जोरात धावु शकत नाही.साहेब मात्र आपल्या घोड्याचा एक पाय कापत होता.
प्रत्येक कं.च्या आधाराखाली इतरही काही कं. वाढत असतात.ह्या कं. शक्यतो सप्लायर असतात.साहेबाने असे ३/४ सप्लायर बांधून ठेवले होते.त्यांचे पेमेंट दर ठरवलेले होते आणि मुदत कागदोपत्री ९० दिवसांची होती.साहेबाने त्यांचे पैसे कधीच वेळेवर दिले नाहीत.तो सगळ्यांना २,३ आणि ४ नं.चे चेक्स देत असे. ते कधीच वटत नसत.१२० दिवस झाले की मग मात्र १ नं.चा चेक देत असे.५ महिने साहेब त्यांचे पैसे बिन व्याजी वापरत असे.पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सप्लायर मंडळी त्यांचा बिसनेस वाढवू शकत नसत आणि त्यामुळे मिळेल त्या दराने साहेबाशी व्यवहार करत.)
तर अशा लंगड्या घोड्यांकडून बरेचसे सामान येत होते. त्यामुळे असेम्बींग साठी ४ माणसे आणि टेस्टींग साठी २ माणसे (मी आणि अशोक) असा आमचा ६ माणसांचाच स्टाफ होता.कायद्याप्रमाणे आम्हाला युनियन बांधता येत न्हवती. ७ पेक्षा जास्त माणसे असतील तरच युनियन बांधता येत होती.कायद्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे लावण्यात साहेब हुषार होता.
वेळप्रसंगी आम्ही सगळेच जण आपापली कामे वाटून घेत होतो आणि इतरही कामे करत होतो.(चहा करण्या पासून ते झाडू मारण्या पर्यंत..)
स.९ ते सं.६ असे ऑफीसचे टायमिंग होते.मी ८:४५ लाच ऑफीसला पोहोचत होतो.सगळ्या किल्ल्या माझ्याकडे आणि अशोक कडे होत्या.त्यासुमारास मोबाईल नुकताच बाजारात आला होता. इनकमिंग कॉलला देखील पैसे पडत होते.येत्या एक दोन महिन्यांत आम्हाला पण मोबाईल मिळेल अशी आवई पण उठली होती.त्यादिवशी माझ्याकडे मोबाईल न्हवता.जवळ १० वा. मी ओफीस मध्ये पोहोचलो.नेहमी प्रमाणे लेथ मशिनवर नजर टाकली.विवेकचे काम सुरु झाले होते.असेम्ब्ली लाईन वर प्रकाश आणि विजय पी.सी.बी. आणि काँपोनंटसशी झटापट करत होते तर महेश आज फाइल्स धुंडाळत बसला होता.अशोक कुठेच दिसत न्हवता.मी सहज म्हणून साहेबाच्या केबिन मध्ये नजर टाकली तर...
साहेब येवून बसलेले होते.ऐन वेळी माझ्या नशिबाने खेळ दाखवले....
आता जे होईल ते बघू, ह्या विचारात मी माझ्या टेबलावर येवून बसलो.अपेक्षेप्रमाणे २/३ मिनिटातच साहेबाचे बोलावणे आलेच.केबिनमध्ये गेलो तर साहेबाने हसून स्वागत केले.गेल्या महिन्याभराचा सगळा रिपोर्ट त्याच्या हातात होता.सरासरी आम्ही दिवसाला १० मशिन तयार करायला हवी होती. आणि आम्ही ११ ते १२ मशिन करून देत होतो.
(खरे तर आम्ही १६ मशिन पण बनवू शकलो असतो.अशोकचे पण म्हणणे असेच होते पण मीच मोडता घातला.एकदा १५च्या वर गेलो की साहेब २०चे टार्गेट ठेवायला कमी करणार नाही आणि मग आपल्याला १ ते २ तास फावला वेळ मिळणार नाही.मी जेवायला घरीच जात असे.जेवून झोपून मग २ ते २:३० पर्यंत कामावर येत असे. ३ ते ४ मी आणि अशोक उद्याच्या कामाची तयारी करत असू. ४ वा. अशोक घरी जायला निघत असे.वेळ-काळ बघून आमचे इतर सहकारी (मी त्यांना कधीच कामगार म्हणून वागवले नाही) दुपारी १२ ते २ सुट्टी घेत.साहेबाचा वाण नाही तर गूण आम्हाला पण लागला होता.
माझ्या आणि अशोकच्या प्रगतीवर साहेब खूष झाला होता.जवळ जवळ ६० ते ७० मशिन्स तयार होती आणि अजून १२० मशिन्सची ऑर्डर त्याच्या कडे होती.मार्केटची भूक ४०० ते ५०० होती आणि आता तर ती वाढतच जाणार होती.महाराष्ट्र आणि गुजरात मधील कारभाराची कुणकुण इतर राज्यात पण पसरली होती.साहेबाने इतर राज्यांत पण जाळे विणून ठेवले होतेच.गळाला एक मोठे राज्य लागले होतेच आणि एक छोटा मासा स्वतःहून तयार झाला होता.
याद्या
16294
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कथाभाग
लिंक लागायला जरा वेळ लागला,पण
हाही भाग उत्तम
सगळे भाग आजच वाचले. मस्त आहेत
बरेच दिवसांनी!
छान
पुढचा भाग
हेच मंतो , पुढचा भाग कदी ?
जबरा...
ही लेखमाला होती?
खुप छान
आवडलेले लेखन.
मला वाटेल तेंव्हा मी लिहीतो....
In reply to आवडलेले लेखन. by आत्मशून्य
पुन्हा सांगतो प्लिज... सरांची बाधा टाळा.
In reply to मला वाटेल तेंव्हा मी लिहीतो.... by मुक्त विहारि
परत एकदा....
In reply to पुन्हा सांगतो प्लिज... सरांची बाधा टाळा. by आत्मशून्य
कॉमनसेन्सला गहन विचार बनवु नका. कारण...
In reply to परत एकदा.... by मुक्त विहारि
मी सामान्य माणूस असल्याने गहन विचार मला झेपत नाहीत....
In reply to कॉमनसेन्सला गहन विचार बनवु नका. कारण... by आत्मशून्य
तुमच्या निरीक्षणाशी मला काही
In reply to मी सामान्य माणूस असल्याने गहन विचार मला झेपत नाहीत.... by मुक्त विहारि
मग त्याला प्रतिसाद प्रपंच का करताय ?
In reply to तुमच्या निरीक्षणाशी मला काही by आत्मशून्य
सगळ्या गोष्टी मीच शिकवायच्या का ?
In reply to मग त्याला प्रतिसाद प्रपंच का करताय ? by मुक्त विहारि
तुम्ही मला शिकवा...असे मी म्हणालो का?
In reply to सगळ्या गोष्टी मीच शिकवायच्या का ? by आत्मशून्य
अरे अजुन थांबला नाहीत ? कमाल आहे तुमच्यातल्या विसंगतीची
In reply to तुम्ही मला शिकवा...असे मी म्हणालो का? by मुक्त विहारि
मी कशाला तुम्हाला शिक्षक समजीन?
In reply to अरे अजुन थांबला नाहीत ? कमाल आहे तुमच्यातल्या विसंगतीची by आत्मशून्य
नेमक्या. याच कारणाने तर मला मिपा आवडते.
In reply to मी कशाला तुम्हाला शिक्षक समजीन? by मुक्त विहारि
नशीब.....निदान इथे तरी एकवाक्यता आली....
In reply to नेमक्या. याच कारणाने तर मला मिपा आवडते. by आत्मशून्य
नक्किच.
In reply to नशीब.....निदान इथे तरी एकवाक्यता आली.... by मुक्त विहारि
अरो हो..
In reply to नक्किच. by आत्मशून्य
हम्म! बहुतेक लिहण्यासारखे काही नसावे.
In reply to अरो हो.. by आत्मशून्य