Skip to main content

भारतरत्न ,सचिन आणी ध्यांनचंद ?

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 16/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनला या क्षणी भारतरत्न मिळाले ही अतिशय आनंदाची आणी अभिमानाची गोष्ट झाली फक्त भारतसरकार मेजर ध्यानसिंग यांना विसरले याचेच वाईट वाटते . भारतीय क्रिडाविश्वावर या दोघांचे अगणित उपकार आहेत त्यामुळे …?

वाचने 6977
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

चुकुन ध्यानसिंग टाइप झाले,त्याएवजी ध्यानचंद असे वाचावे.

In reply to by बाबा पाटील

ध्यानचंद ह्यांचं खरं नाव ध्यानचंद सिग असंच होतं! बाकी तुम्ही म्हणताय त्यावर नो कमेंट. जे.पी.

पूर्ण सहमत, विश्वनाथन आनंदचा नंबरही लै वरचा आहे या यादीत. काये ना, क्रिकेट हाच एकमेव खेळ आहे भारतात, त्यामुळे साहजिकच क्रिकेटचा डॉन वर घेतला जातो तर बाकीचे खेळ उपेक्षेने मरतात. पण ### कुणाला पडलीये?

In reply to by बाबा पाटील

हा आता पहिलाच खेळाडु.. कदाचीत आनंदच्या करीअर शेवटी त्यालाही मिळेल. :( त्या काळात ध्यानचंदना/हॉकीला 'सपोर्ट' कितीसा होता? पहिल्यापासुन फक्त क्रिकेट आणी क्रिकेट. आपलं सरकार एका खेळाडुला मरणोत्तर भारतरत्न देइल असं वाटत नाही :(

फक्त क्रिकेट ला जास्त महत्व देऊन चालणार नाही सर्वच खेळाचे कौतुक केले पाहिजे विश्वनाथन आनंद ला अगोदर मिळायला पाहिजे होता.

वाटच बघत होतो, आलाच हा विषय बोर्डावर... चालू द्या....

In reply to by प्रभो

सरदार पटेल, बाबासाहेब यांना भारतरत्न देवून सरकारने त्यांना राजीव/इंदीरा गांधींच्या पंक्तीला बसवलं. त्यांना हा सन्मान द्यायलाच नको होता.

स्वातंत्रपूर्व काळात परफॉर्म केलेल्यांना गृहीत धरत नसावेत, भारताला क्रिकेटची ओळख करुन देणारे सर महाराजा रणजीतसिंह सुद्धा तेव्हडेच लायक आहेत भारतरत्न ला !

भारतरत्न हा पुरस्कार भारताची कीर्ति ज्याने जगभर वाढविली अशा व्यक्तीला द्यायला हवा. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ज्याने मह्राराष्ट्राची कीर्ति भारतभर पसरविली अशाला द्यायला हवा. व साहजिकच असा पुरस्कार दरवर्षी देण्याचे मग बंधन रहाणार नाही. सर्वच पद्नम पुरस्कार व भारतरत्न तसेच क्रीडा पुरस्कार हे राजकारणाने बरबटलेले असतातच असे नाही. पण काही च्या बाबतीत असा संशय घ्यायला जागा आहे. एक तिवारी नामक खासदार असे म्हणाले आहेत की सचिन काय फुकट खेळला की त्याला हा पुरस्कार द्यावा. मग त्याना असे विचारावेसे वाटते की लताबाई, एम जी रामचंद्रन व भीमसेन जोशी हे काय फुकटात " समाजसेवा" करीत होते.काय? मी सांगितलेला निकष लावायचा म्हटले तर कदाचित मदर तेरेसा , म गांधी हेच या पुरस्काराचे खरे मानकरी ठरतील.

In reply to by चौकटराजा

ही तुलना योग्य वाटत नाही. लताबाईंना खिरापती सारख्या गोष्टी वाटण्यात आल्या नाहीत. तिवारींच्या बोलण्यात बरेच तथ्य आहे. खालील दुव्यावर असलेले "व्यक्तिनिष्ठा का विज्ञाननिष्ठा हे पत्र वाचावे http://epaper.loksatta.com/187003/indian-express/19-11-2013#page/6/2

In reply to by मराठी_माणूस

सचिन व लताबाई याना मिळालेया फेवर्सची यादी करा . पदमभूषण, दादासाहेब फाळके , भारतरत्न, राज्यसभेची खासदारकी, लताबाईंच्या नावाने मध्यप्रदेश चा पुरस्कार ईई अनेक गोष्टींचा वर्षाव त्यांच्या वरही झालेला आहे. सचिन व लताबाई या दोघांचीही बलस्थाने व उणीवा अभ्यासून त्यांचा चाहता असणारा- चौ रा.

सचिनच्या बरोबर किंवा आधी कै. ध्यानचंद, लिअँडर पेस व विश्वनाथन् आनंद यांना पुरस्कार मिळायला हवा होता. त्यांनीही त्यांच्या क्षेत्रात सचिनइतकीच थोर कामगिरी केली आहे. सचिनला पुरस्कार घाईघाईत देण्यामागे सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली अत्यंत खालावलेली प्रतिमा उजळण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. सचिनच्या निवृत्तीमुळे भारलेल्या व भावनिक वातावरणात आपली पोळी भाजून घ्यायचा हा प्रयत्न आहे. यासाठीच सामन्याच्या दुसर्‍या दिवशी पप्पूदेखील स्टेडियममध्ये आला होता.

आज संध्याकाळी बातम्यान मध्ये मनुष्य बळ विकास राज्य मंत्री असलेल्या त्या छपरी शशी थरूर ला हाच प्रश्न विचारलेला म्हणतोय कसा ध्यानचंद तर मृत्यू पावले आहेत आहेत त्यांना ह्या वर्षी काय आणि काही वर्षांनी भारतरत्न दिले तर काय असा फरक पडणार आहे !

मुळात भारतरत्न च्या पात्रता निकषांमध्ये खेळ समाविष्ट नव्हते, माझ्या माहितीनुसार. तो निकष त्या यादीत जोडला गेला, सचिन तेंडुलकर ला भारतरत्न पुरस्कार दिला गेला. सगळंच जुळवाजुळव करून आणलेलं. भारतरत्न साठी खरं तर फार मोठं; देशाच्या प्रगतीला केंद्रस्थानी ठेवून केलेलं कार्य असायला हवं. खेळाडू, किंवा त्या जागी गायकही; 'देशोन्नती' साठी खेळत किंवा गात नाहीत. किंवा त्यांच्या कलासाधनेतून देशाची प्रगती अशी घडत नाही. त्यांच्या स्वार्थातून काही अंशी परार्थ साधला जातो इतकंच. वैज्ञानिक, विचारवंत, किंवा उद्योगात क्रांती करणारे उद्योजक; यांच्या कार्याने देशाची वैज्ञानिक, आर्थिक किंवा तात्विक प्रगती जरूर होते. असो. मला काही रुचलं नाही हे भारतरत्न चं प्रकरण.

सच्याच्या फलंदाजीनं वेड लावलंय हे खरं आहे. सच्याचं स्पीचही रड्वणारं होतं.. पण थेट भारत रत्न :( लोकसत्ताचा सुंदर अग्रलेख. भारत आणि रत्न -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याचमुळे सचिन आणि प्रा. सीएनआर राव यांच्यासारख्या संशोधकांस एकाच पंगतीत बसवून त्यांच्या मुखी भारतरत्न पदाचा घास भरवण्याचा निर्बुद्धपणा आपल्याकडे होऊ शकतो. राव यांची सारी हयात विज्ञान संशोधनासाठी गेली आणि त्यासाठी कोणतीही मानमरातब वा कौतुक पदरात पडण्याची शक्यता नसतानाही ते आपले काम करीत गेले. ते करण्यात त्यांना आनंद होता. त्या आनंदात भारतासारख्या विज्ञानदुष्ट देशाचे काही भले व्हावे अशी इच्छा होती. त्याचमुळे अत्यंत कमी मोबदल्यात ते आपले मूलगामी काम करीत राहिले. सचिनबाबत हे असेच म्हणता येईल काय? त्याच्या खेळाने भारतीयांस आनंद दिला यापलीकडे अधिक काय झाले?
अप्रतिम!!

In reply to by विद्युत् बालक

नै म्हणजे सीएनार राव आणि सचिन यांना एकाच तागडीत तोलणे हा मूर्खागमनीपणा असे आम्हांसही वाटते, परंतु या सीएनार रावांबद्दल बोंबलणारे लै लोक आहेत. अन ते कोल्ह्याला द्राक्षे आंबट असेही नव्हेत. शीएनार राव हे प्रत्यक्ष संशोधनापेक्षा म्यानेज करण्यात जास्त हुशार असल्याने त्यांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. त्यात अगदीत तथ्य नाही असे म्हणवत नाही. असो.

In reply to by बॅटमॅन

सचीनला अगदी पद्धतशीरपणे क्रिकेटसम्राट बनवण्यात आलं, कारण क्रिकेट अर्थकारणाच्या दृष्टीने त्या पदावर एक भारतीयचं आरोहण आवष्यक होतं... अशा टाईपचे खमंग दावे अगदी पुराव्यानिशी करणारे महाभाग देखील आहेत.

In reply to by अर्धवटराव

ते तर आहेच हो, वादच नै. पण सचिनचे टॅलेंटहि आहेच, त्याबद्दल दोनचार पादरे पावटे वगळता कोणी कै बोलत नाही. शीएनार रावांबद्दल मात्र ओरड तुलनेने जरा जास्त दिसली परिचित वर्तुळात म्हणून म्हणालो इतकेच.

In reply to by अर्धवटराव

सच्यामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, बेकारी, भ्रष्टाचार आणि दररोजच्या जीवन मरणाचे प्रश्न सहजपणे विसरल्या जातात म्हणून सच्याला बोर्डानं खेळायला लावले.... इतकेच नव्हे तर देशात सध्या 'सब जख्मपे एकही अक्सर इलाज 'सचिनच' आहे' असेही म्हटल्या जाऊ लागले त्यामुळे वानखेडेवरच्या डोळे भरुन आणना-या स्पीच नंतर तर भारतरत्नाच्या वर आणखी एखादा पुरस्कार किंवा थेट पंतप्रधान,राष्ट्रपती असे एखादे पद सच्याला देता आले असते तर ते दिले पाहिजे होते असे म्हणनारे महाभागही आता गल्लोगल्ली सापडू लागले आहेत. :) -दिलीप बिरुटे

सचिन ला दिला , प्रोब्लेम नाही , जरी तो एका खाजगी क्लब साठी खेळतो . BCCI आणि भारत यांचा काही संबंध नाही. त्याने किती पैसा मिळवला हा त्याचा प्रश्न. पण खाशाबा जाधव यांनी खिशा मध्ये दमड्या नसताना जीवाचा आटापिटा करून ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवले. आणि ते देशाचे प्रतिनिधी म्हणून. त्यांना साधा खेलरत्न पण नाही. ध्य्न्चंद असतील भारी पण हॉकी ला सरकारचा पाठींबा होता. हे कोणी विसरू नये.

शीएनार राव हे प्रत्यक्ष संशोधनापेक्षा म्यानेज करण्यात जास्त हुशार असल्याने त्यांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे
+१ पण त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे हे विसरता कामा नये. शिवाय भारतात मॅनेज करता येईल पण जगभरच्या विद्यापीठांना ** नाही बनवता येणार्.मागे अब्दुल कलाम ह्यांच्याबाबतही असे प्रश्न निर्माण केले गेले होते.काहीनी म्हंटले तसे 'Kalam was more of management material than scientist'.

खरतर सचिन वादातीत श्रेष्ठ आहे.सचिनमुळे भारतातील कित्येक पिढ्या मैदानावर जाउ लागल्या.नाहीतर तोपर्यंत पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब आणी खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब, हीच भारतीय मानसिकता बदलण्याचे काम एका सचिन नामक व्यक्तीने केले.ध्यानचंद त्यांच्या जागी निश्चित श्रेष्ठ आहेत्,त्यामुळे सचिनला पुरस्कार देताना त्यांच्या नावाचाही विचार होणे गरजेचे होते.असो सरकारचीही काही अपरिहार्य कारणे असु शकतात्, पण सचिन त्याला लायकच नाही असे समजणार्‍यांनी आपली लायकी आणी आपण आजपर्यंत किती समाजोपयोगी काम केले आहे याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

सुभाषचन्द्र् बोस य महान नेत्याच्य बाबत काय झाले या पुरस्कारवरुन माहितच असेल कि सर्वांना....