नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !
विकी डोनर सिनेमा
विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते. चित्रपटाच्या शेवटी सर्वजण यातील नायकाच्या या कामाचे कौतुक करतात व त्याचा स्विकार करतात व चित्रपट वीर्यदान कशी चांगली गोष्ट आहे हे त्याचा अंगिकार केला पाहीजे हे ठसवितो.
वीर्यदान आणि नियोग एक तुलना
आता गंमत अशी आहे की आपल्या संस्कृती त तर या साध्या निरुपद्रवि वीर्यदान पेक्षा ही अधिक प्रगत अधिक प्रभावी अशी नियोगा ची विलक्षण परंपरा होती. व तिला मुख्य म्हणजे धर्म व जन मान्यता ही होती. तिचा वापर होत होता त्या संदर्भात धर्मशास्त्रांनी व्यवस्थित नियम ही घालुन दिलेले होते. तर असा जो समाज एके काळी नियोगा चा सरळ स्वच्छ अवलंब करीत होता जो नंतरच्या काळात अनेक कारणांनी बंद होत गेला. ( त्यातील एक महत्वाचे म्हणजे कलिवर्ज्य या योजनेनुसार इतर अनेक गोष्टींसोबत नियोगा वर ही बंदी घालण्यात आली ) अशा समाजाला वीर्यदान या नियोगा च्या तुलनेत अत्यंत साध्या आणि अजिबात COMPLICATED नसणार्याय विषयावर शिक्षीत/प्रोत्साहीत करण्यासाठी एक सिनेमा काढावा लागतो.आणि गंमत म्हणजे त्यातील नायकाचे असे वीर्यदान करणे आजही बर्याोच जणांना आवडत- रुचत- पचत नाही कुठेतरी सांस्कृतीक धक्का बसल्यासारखे वाटते हा मला काळाने केलेला एक मोठा विनोद वाटतो. म्हणुन या निरुपद्रवी वीर्यदाना पेक्षा कैक पट व्यापक प्रभावी असलेली नियोग पध्दती नेमकी कशी होती हे मांडावेसे वाटते.
प्राचीन भारतीय संस्कृती त नियोग ही एक नियमबद्ध, धर्मशास्त्र संमत, सर्ववर्णीयांस परवानगी असलेली एक परंपरा होती. या द्वारे ज्या स्त्रिला विधवा झाल्यावर मुल झालेले नसल्यास अथवा पति जिवंत असतांना त्याच्या नपुसंकते ने अथवा असाध्य आजाराने पुत्र प्राप्ती संभव होत नसल्यास.पति च्या संमतीने अथवा ज्येष्ठांच्या/ गुरुंच्या संमतीने एखाद्या दुसर्यात पुरुषाची नेमणुक करुन त्याच्याशी रीतसर नियमांचे पालन करुन संभोग करुन पुत्र प्राप्ती करुन घेण्याचा हक्क देण्यात आला होता. यात कुठ्ल्याही चमत्काराने अथवा शक्तीने पुत्र प्राप्ती करुन देणे असे कधीच नव्हते.रीतसर मान्यताप्राप्त संभोगाने पुत्र प्राप्तीची ही एक धर्मसंमत आणि व्यावहारीक अशी परंपरा होती.
नियम कायदा बनविणारे धर्म साहीत्य व त्याचे ढोबळ वर्गीकरण
सर्वसाधारणपणे प्राचीन धर्म साहीत्यात श्रुती (मुळ वेद साम-अथर्व-रुग्वेद-यजुर्वेद ) ,स्मुर्ती ( उदा.मनुस्मृती, नारद्स्मृती इ.) धर्मसुत्रे ( बौधायन. आपस्तंब इ.) पुराणे ( विष्णुपुराण,मत्स्य्पुराण इ.) अशी विभागणी असते. त्यानंतर विवीध टीकाकारांच्या टीका जशी (मनुस्मृती वरील मेधातीथी ने केलेले भाष्य,) यात बहुतेक वेळा एका समान मुद्यांवर भरपुर भेद असतात. यात शेवटचा निकाल हा श्रुती त काय आहे यावर होत असतो. पण एखादा विषय घेउन तुम्ही शोध घेतला जसे उदा इथे नियोग या SPECIFIC विषया वर निरनिराळ्या ठिकाणी काय लिहीलेले आहे हे जर बघीतले तर त्या विषयाचे एक निश्चित चित्र बर्याषपैकी समोर येते. मतभेद जरी आढळले तरी एकदंरीत शास्त्रकर्त्यांची त्या विषयासंबंधीची भुमिका काय आहे आणि त्यांना नेमके काय अभिप्रेत होते. हे निश्चितच लक्षात येते. त्याहुन महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात घेतलेली भुमिका काळानुरुप कशी बदलत जाते कुठल्या कारणांनी ही भुमिका बदलते हे पाहणे हा ही एक मोठा INTERESTING भाग असतो.
या लेखाच्या सोर्स विषयी
आता आपण नियोगा विषयी निरनिराळ्या महत्वाच्या धर्मशास्त्रां मध्ये काय ,तरतुदी, नियम व तत्वे व व्याख्या होत्या या बघुयात म्हणजे नियोग या परंपरे विषयीचे अधिक चित्र स्पष्ट होत जाईल. ( खालील सर्व नियम मुळ संस्कृत भाषेत मुळ ग्रंथात व्यवस्थित उपलब्ध आहेत हा त्यांचा थोडक्यात मराठी अनुवाद आहे. जाणकार मुळ संस्कृत श्लोक कधीही तपासुन पाहु शकतात) या खालील विवेचना चा मुख्य आधार ( HISTORY OF DHARMSASTRA VOLUME II , PART -1 , CHPTER XIII, ( NIYOGA ) PAGE NO. 599 TO 607 ) हा आहे याचे लेखक आहेत श्री पांडुरंग वामन काणे हे या विषयांतील अत्यंत अधिकारी व्यक्ती मानले जातात आणि माझ्या अल्प सामान्य झानानुसार हे भारतरत्न हा सम्मान मिळवणारे पहीले मराठी माणुस आहेत. हा ग्रंथ अत्यंत मोठा जवळजवळ ६००० पानांचा आणि संशोधकीय वर्तुळात प्रतिष्ठा प्राप्त आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की यातील सर्वच मते बरोबर च आहे किंवा चिकीत्सेची गरज च नाही असे सुचविण्याचा हेतु अजिबात नाही. जाणकार मुळ ग्रंथ पडताळुन पाहु शकतात.)
नियोगा संबधी सर्वात जुने धर्मशास्त्र गौतमधर्मसुत्र चे विवेचन बघा
१-अशी स्त्री जीचा पति मरण पावलेला आहे, आणि जीला मुल व्हाव अशी इच्छा आहे ती आपल्या पतीच्या भावा कडुन पुत्र प्राप्ती घरातील ज्येष्ठांच्या संमतीने करुन घेउ शकते.
२-आणि मासिक पाळीचे पहीले चार दिवस वगळुन त्यानंतर च्या दिवसांत ती पतीच्या भावाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते..
३-जेव्हा पतीचा भाउ अस्तीत्वात/ ऊपलब्ध नसेल तेव्हा ती सपिंड, सगोत्र ,सप्रवरा कींवा स्व-वर्णिय पुरुषाशी पुत्र प्राप्तीसाठी संभोग करु शकते.( काही शास्त्रकारांच्या मते केवळ दीर च हे काम करु शकतो इतर कोणी नाही यात पुष्कळ मतभेद आहेत)
४-या नियोगा चा वापर स्त्रिला केवळ दोन पुत्रां पुरताच करता येउ शकतो. त्याहुन अधिक नाही.
५-जेव्हा पति जिवंत असेल आणि पुत्र निर्मीती साठी सक्षम नसेल आणि त्याच्या परवानगीने जेव्हा नियोग घडवला जाउन जर पुत्र निर्मीती झाली तर असा पुत्र हा त्या पति चा मानला जाईल.
६- वरील प्रमाणे झालेला पुत्र क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो. वरील स्त्रि क्षेत्र म्हणुन ओळखली जाते.अशा स्त्रिचा पती हा क्षेत्रिन आणि ज्याची नेमणुक या कार्यासाठी केली जाते त्याला बिजिन (जो बीजारोपण करतो ) अथवा नियोगीन असे म्हटले जाते.
वसिष्ठ धर्मसुत्रा चे नियोगा संबंधी नियम बघा
१-विधवा स्त्रिचा पिता अथवा भाउ यांनी गुरुंची बैठक बोलाविली पाहीजे आणि त्यांच्या संमतीने च मग बिजीन ची नेमणुक पुत्र प्राप्तीसाठी केली पाहीजे.
२-यात काही प्रतिबंध घातलेले आहेत. जर विधवा स्त्रि पति वियोगाने वेडी अथवा मानसिक संतुलन हरवलेली असेल, अथवा म्हातारी असेल अथवा रोगग्रस्त असेल तर मात्र नियोग करण्यास मनाई आहे.
३-बिजीन ने प्रजापती मुहुर्त ( हा जसा ब्रम्ह मुहुर्त आहे तसा एक मुहुर्त आहे ) बघुन , पतिसारखी भेट घेउन, मात्र कोठल्याही प्रणय क्रिडा न करता, तिला शिवीगाळ न करता तिचा धिक्कार न करता च पुत्रप्राप्ती साठी विधवे शी संभोग केला पाहीजे.
४-संपत्ती त सहभाग मिळेल या हेतुन बिजीन नियोग करीत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहीजे. बिजीन ने कर्तव्य भावनेने निस्वार्थ भावनेने हे सर्व केले पाहीजे ही शास्त्रकाराची अपेक्षा आहे.
बौधायन धर्मसुत्राने केलेली क्षेत्रज ची व्याख्या
असा पुत्र जो
अ-जो विधवे च्या परवानगीने
ब-नपुंसक पुरुषाने आपल्या स्त्रिशी संभोग करण्यास दीलेल्या परवानगीने
क-असाध्य आजाराने ग्रस्त अशा पुरुषाने आपल्या स्त्रिशी संभोग करण्यास दिलेल्या परवानगीने
करण्यात आलेल्या परपुरुषा बरोबर च्या ( बिजीन ) संभोगाने झालेला आहे. असा पुत्र जो या वरील संमत संभोगाद्वारे झालेला आहे तो क्षेत्रज म्हणुन ओळखला जातो.
मनुस्मृती त आलेले नियोगा संबधी चे नियम
( नियोगा विषयी मनु दोन परस्पर विरोधी भुमिका घेतो काही श्लोकांत तो नियोगा चा पुर्णपणे विरोध ही करतो व काहीत समर्थन करतो जागेअभावी विरोधाचे श्लोक घेतलेले नाहीत आणि लेखाचा हेतु नियोगाला काय व कशी संमती होती हा आहे. त्यावरील मतभेद व नियोगावर नंतर बंदी कशी व का आणली हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे )
तर मनुस्मृती नुसार ,
एखादी विधवा जेव्हा नियोगासाठी पतीचा भाउ अथवा पती च्या सपिंड पुरुषाशी संभोग करते आणि जर तिला त्यानंतर ही पुत्रप्राप्ती झाली नाही तर ती दुसर्या एखाद्या पुरुषाचा वापर नियोगासाठी करु शकते मात्र मनुस्मृती त्यासाठी दोन नियम लावते.
१-अशा बिजीन ने अंधारात च स्त्रिशी संभोग केला पाहीजे
२-अशा बिजीन चे शरीर भरपुर तुप व तेलाने माखले पाहीजे.
३-आणि याने केवळ एक च पुत्र या विधीने जन्माला घातला पाहीजे.(इथे वरील धर्मशास्त्रांशी मनु विरोध दर्शवितो दोन एवजी एकच पुत्राची परवानगी देतो.)
कौटील्याचे नियोगा संबधीचे नियम
१-जो राजा म्हातारा अथवा असाध्य व्याधी ने ग्रस्त आहे अशा राजाने अशा मातृबंधु ची ज्यात त्याच्या स्वत: सारखेच चांगले गुण आहेत अशा पुरुषाची नेमणुक नियोगासाठी करुन त्याद्वारे राणी कडुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
२-जो ब्राम्हण पुत्रा शिवाय च मेला आहे. त्याच्या पत्नी साठी ही मातृबंधु अथवा सपिंड पुरुषाची बिजीन म्हणुन नेमणुक करुन पुत्र प्राप्ती करुन घेतली पाहीजे.
आता वरील नियोगाच्या विधी संबंधातील कौटील्याचे नियम पहा कुठल्या कंडीशन्स मध्ये नियोग होउ शकतो वगैरे संबधीचे नियम व अटी.
१-नवरा जिवंत अथवा मृत असो त्याला अगोदर्च पुत्र असेल तर नियोग करता येत नाही.
२-नियोगासाठी नेमलेला बिजीन हा नवर्यााचा भाउ अथवा सपिंड अथवा सगोत्र ( पतिचा) अथवा स्वजातीचा (पतिच्या) च असला पाहीजे अन्य पुरुष अलाउड नाही.
३-कुटुंबातील गुरुंनी बसुन चर्चा करुन च नियोगाचा निर्णय घेतला पाहीजे.
४-या कामासाठी नेमलेल्या बिजीन ने वासने ने प्रेरीत होउन संभोग न करता कर्तव्यभावनेने च याला अंमलात आणले पाहीजे.
५-बिजीन ला अगोदर तुप व तेलाने व्यवस्थित मर्दन केले पाहीजे.( जेणेकरुन कर्तव्यभावना शाबुत राहील वासना निर्माण होणार नाही हा हेतु आहे)\
६-बिजीन ने या स्त्रिशी मधुर संभाषण किंवा चुंबन किंवा अथवा प्रणय ( फ़ोर प्ले –कोर्टशिप –) न करता संभोग उरकला पाहीजे.( जेणेकरुन कुठलाही बॉन्ड दोघांत उत्पन्न व्हायला नको)
७-हा संबध फ़क्त एक अथवा दोन पुत्र होइ पर्यंत च अलाउड आहे.
८-स्त्रि ही बिजीन पेक्षा वयाने लहान हवी आणि निरोगी हवी.
९-एकदा नियोगाद्वारे पुत्र प्राप्ती झाली की नंतर मात्र बिजीन आणि स्त्रि यांनी परस्परांशी संबंध सासरा व त्याची सुन असे ठेवले पाहीजेत.
१०-असा नियोग जर ज्येष्ठांच्या संमती विना झाला तर तो पाप मानण्यात येईल.
११-जरी ज्येष्ठांची संमती असेल मात्र पत्नीला जर स्वत:च्या पती पासुन अगोदरच पुत्र प्राप्ती झाली असेल तर वरील ज्येष्ठांची संमती असुनही हा नियोग पाप मानण्यात येईल.
नियोगा संदर्भात मनात निर्माण होणारे काही प्रश्न व शंका ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )
१-शास्त्रकर्त्यांचा बिजीन आणि स्त्रि दरम्यान जो भावबंध निर्माण न होउ देण्याचा प्रयत्न आहे तो खरच प्रत्यक्षात यशस्वि होत असेल का ? ( याच मुद्यावर अमोल पालेकरांचा एक चित्रपट येउन गेला आहे यात एका राणीला नियोगासाठी राजा पाठवितो सुरुवातीला फ़ारशी उत्सुक नसलेली राणी मात्र नंतर बिजीन ने दिलेल्या संभोगसुखाने बदलत जाते, त्याच्यात मनाने गुंतत जाते अस काहीस त्यात फ़ार तरलतेने दाखविलेल आहे)
२-अंगाला तुप तेल लावुन एक प्रकारे बिजीन विषयीचे आकर्षण कमी करण्याचा प्रयत्न कीतपत यशस्वि होत असावा?
३-ज्येष्ठ च सर्व ठरवित असत त्यांची संमती ही अट जवळजवळ प्रत्येक च धर्मशास्त्र घालते. तर ती जी काय स्त्रि आहे तीच्या संमती विषयी तर काही कुठे फ़ारसा नियम वगैरे दिसत नाही की नेहमीप्रमाणे स्त्रिची संमती गृहीत च धरलेली दिसतेय.
४-पुत्र प्राप्ती हाच शब्द सर्वत्र स्पष्टपणे वापरला आहे कन्या प्राप्ती हा काही उद्देश दिसत नाही. कन्येसाठी काही नियोगाचा अवलंब केलेला दिसत नाही. पण उद्देश जरी पुत्र असला आणि झालीच कन्या तर काय बर करीत असावेत ? एक संधी अधिक देत असणार काय? उल्लेख तर काही आढळला नाही असा. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
५-आजच्या काळात या नियोग परंपरेचे पुन्हा एकदा पालन करणे सुरु केले तर त्याचे काय सामाजिक नैतिक परीणाम होतील?
६-आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच या नियोग परंपरेला समर्थन असेल की विरोध आणि कुठल्या मुद्यावर ?
वाचने
15830
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
एक खुप चांगला, व चर्चा
***
नियमांच पालन झाले कि नाही
महाभारतातले उल्लेख
In reply to महाभारतातले उल्लेख by पैसा
लेखात उल्लेख केलेल्या
In reply to लेखात उल्लेख केलेल्या by खटासि खट
खटासि खट यांस
लेखात उल्लेख केलेल्या नियोगसंततीला समाजमान्यता होती हे धाडसी विधान आहे काएखादी प्रथा जेव्हा समाजात व्यवस्थित खोलवर रुजते वापरात आणली जाते तेव्हाच तिच्या संदर्भात निरनिराळे नियम घालुन देण्याची निकड निर्माण होत असते. शास्त्रकार यावर इतके नियम बनवितात व्याख्या निश्चीत करतात या सर्व गोष्टी एखाद्या समाजमान्यता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात प्रचलित असलेल्या परंपरे बाबत घडत नाहीत. एके काळी तर कानीबालीझम ही सर्वत्र ( सर्व जगांत) प्रचलित होता तर नियोग कोणती मोठी गोष्ट आहे ?In reply to महाभारतातले उल्लेख by पैसा
छान लेख! .. काही वर्षांपूर्वी
In reply to छान लेख! .. काही वर्षांपूर्वी by मृगनयनी
अंनत नाग यांनी राजाचे काम केले होते
In reply to अंनत नाग यांनी राजाचे काम केले होते by रुस्तम
ओह.. येस्स... राजाचे काम
उत्तम विषय.
In reply to उत्तम विषय. by प्रचेतस
यातले जाणकार
In reply to यातले जाणकार by हवालदार
जाणकार म्हणजे श्रॄती, स्मृती,
In reply to जाणकार म्हणजे श्रॄती, स्मृती, by प्रचेतस
समजावून सान्ग्न्यबद्दल
In reply to जाणकार म्हणजे श्रॄती, स्मृती, by प्रचेतस
धत्तेरेकी
In reply to यातले जाणकार by हवालदार
पहिली समिधा पडली..
-आजच्या काळात सामाजिक नैतिक परीणाम
In reply to -आजच्या काळात सामाजिक नैतिक परीणाम by सुबोध खरे
स्पर्म्स पूल करतात का? माझ्या
In reply to -आजच्या काळात सामाजिक नैतिक परीणाम by सुबोध खरे
पितृत्वावर दावा ठोकण्यासाठी कोणी येत नाही आणि
त्या काळीसुद्धा प्रोफेशनल
.
सहमत ……
या संदर्भात काही आणखी काही
हे पटत नाही
३.नियोगी, नेगी, अशी आडनावे
हा हट्टच समजू शकत नाही
In reply to हा हट्टच समजू शकत नाही by ऋषिकेश
फरक पडता है भाय... वंशवृद्धी
In reply to फरक पडता है भाय... वंशवृद्धी by डॉ सुहास म्हात्रे
ते सगळं ठिक.. समाजाला/इतरांना
In reply to ते सगळं ठिक.. समाजाला/इतरांना by ऋषिकेश
आता बदलत आहे समाज..
In reply to आता बदलत आहे समाज.. by मराठी कथालेखक
मुळाअत DINK चा समाजाशी फारसा
In reply to हा हट्टच समजू शकत नाही by ऋषिकेश
सजीवांचे सगळे अस्तित्वच DNA
In reply to सजीवांचे सगळे अस्तित्वच DNA by शैलेन्द्र
आँ
In reply to हा हट्टच समजू शकत नाही by ऋषिकेश
वंश वाचवाण्य्साठी
शंका..
In reply to शंका.. by चिगो
अहो ते देव हे उत्तरकुरु होते
In reply to अहो ते देव हे उत्तरकुरु होते by प्रचेतस
येस!