Skip to main content

धुसरिका - व्युत्क्रम

लेखक जातवेद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा

हठयोग- कुंडलिनी (१)

लेखक शरद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी...हठयोग मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू. सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते.

नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत

लेखक Hrushikesh यांनी मंगळवार, 17/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांन्नो, नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.

बंद होणार्‍या विमा योजना - वस्तुस्थिती काय आहे ??

लेखक प्रसाद भागवत यांनी मंगळवार, 17/12/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेले महिना दोन महिने लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत बर्‍याच वावड्या उठत आहेत. बहुतांशी सर्वच कंपन्याच्या प्रतिनिधीं कडुन ' लोकप्रिय’ प्लान्स बंद होणार आहेत, प्रिमियम वाढेल --' ई. कारणे सांगुन ग्राहकांची फसवणुक चालु असल्याचे पाहण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की IRDA ( विमा क्षेत्र नियमित करणारी सर्वो्च्च संस्था) ने काही मोठे बदल सुचविले हे खरे आहे परंतु हे बदल निश्चितपणे ग्राहक हिताचे आहेत.

मदत : वायरलेस इंटरनेट डाँगल

लेखक राजो यांनी मंगळवार, 17/12/2013 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, सध्या बावधन, पुणे येथे स्थलांतरित झालो आहे. नवीन इमारत असलेने अजून वायर्ड इंटरनेटचा पर्याय (बी.एस्.एन्.एल., हॅथवे... वगैरे) आसपास उपलब्ध नाही. वायरलेस डाँगल हा पर्याय कितपत उपयुक्त आहे? ब्राऊझिंगव्यतिरिक्त डाऊनलोड करण्याचाही वापर असेल च. टाटा डोकोमो, फोटॉन, रिलायन्स, इतर ३जी प्रोव्हायडर्स पैकी कोणता योग्य ठरेल? इतर काही पर्याय असल्यास सुचवावेत. धन्यवाद.

जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये :)

लेखक Atul Thakur यांनी मंगळवार, 17/12/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

Royal Palms, आरे कॉलनी, गोरेगाव

लेखक नित्य नुतन यांनी मंगळवार, 17/12/2013 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय मिपाकर महोदयांसी, विनंती विशेष ... पत्रास कारण की, मुंबईमध्ये घर (१ bhk) घेणे विचाराधीन आहे... बर्याच संशोधनांती Royal Palms, Aarey Colony, गोरेगाव चे location परवडेबल वाटते आहे ... पण आंतरजालावर या project बद्दल फारच वाईट प्रतिक्रिया दिसत आहेत ... एक दोन मित्र जे तिथे राहत आहेत त्यांच्या मते या area मध्ये ह्या किमतीत चांगले deal आहे.. पाण्याचा थोडासा problem असला तरीही ....connectivity चांगली आहे.. इत्यादी इत्यादी ... मिपाकरांपैकी कोणी या area बद्दल जाणत असल्यास फार मदत होतील ... धन्यु, - मायानगरीप्रेमी

बालपणातल्या हिरोंसोबत

लेखक नवनाथ पवार यांनी मंगळवार, 17/12/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्यान कुठल्या निमित्ताने घरात सतत साफ सफाई सुरु असते. आईने अचानक एकदा फर्मान सोडलं की, माळ्यावर पेटीत जी काही रद्दी साठवून ठेवली आहेस, ती एकदाची बाहेर काढ ! या घरात राहायला आलो त्याला आता पाच -एक वर्षे झाली. सामान आवरण्याच्या गडबडीत जुन्या घरातील माझी सर्व जुनी वह्या पुस्तके त्या पेटीत भरली होती. रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा मुहूर्त साधून ती पेटी उघडली. वर्तमानपत्रांच्या कात्रणांच्या फायली, निबंध व चित्रकलेच्या वह्या आणि गोष्टींची खूप सारी पुस्तके. एक एक वस्तू मला भूतकाळात नेणारी.

कामगार कट्टा एक अस्वस्थ करणारे वास्तव :

लेखक psajid यांनी मंगळवार, 17/12/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ए.बी.पी. माझा वर एक मन सुन्न करणारी बातमी पाहिली. नांदेड लातूर या ठिकाणच्या कायम विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले. भारतामध्ये आज रोजगाराची फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. आज कौटुंबिक जबाबदारी किंवा परिवाराचे पालनपोषण या साठी लोकांचा परीस्थीतिशी, महागाईशी अविरत असा न संपणारा झगडा सगळीकडे सुरु असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रामध्येही रोजगाराचे चित्र फार आशादायक नाही हे वरील उदाहरणावरून लक्षात येते.

हरिश्चंद्राचं व्हॉट्स अ‍ॅप !!

लेखक सूड यांनी मंगळवार, 17/12/2013 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर कुठेही का भेटेनात; मिपावरील आयडी, डू आयडी, खादाडी ह्या सगळ्या चर्चा संपल्या की मध्येच कोणीतरी भटकंतीचा विषय काढतं. काही वेळा हा विषय पब्लिक लैच सिरीयसली घेतं मग व्हॉट्स अॅप वर ग्रूप क्रीएट होतात भटकंतीच्या चर्चेसाठी!! अशीच एक पब्लिकने मनावर घेतलेली भटकंती म्हणजे हरिश्चंद्रगडाची. सात डिसेंबर तारीख पक्की झाली आणि मग कसं जायचं कुठे थांबायचं यावर चर्चा रंगायला लागल्या. आता जाणारे सगळेच नवखे, त्यात कळलं की गडावर जायच्या पाच (?) वाटा आहेत. त्यातली नळीची वाट म्हणजे कठीण आणि पाचनई गावातून जाणारी बर्‍यापैकी सोपी. शेवटी पाचनईच्या वाटेने जायचं ठरलं.