मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तांदळाची उकड

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १ वाटी तांदुळ पिठी १ वाटी आंबट ताक १ वाटी पाणी २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे २-३ लसूण पाकळ्या ठेचून १ टीस्पून मोहरी १ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हिंग कढीपत्ता मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा. त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या. आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढा. उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात तांदळाची पिठी घाला, नीट एकत्र करुन वाफ काढा. . गरम उकड साजूक तूप व कोथींबीर घालून सर्व्ह करा. . . आवडत असल्यास फोडणीत हळद घाला. साजूक तूपाऐवजी कच्च तेल घालून ही उकड खाता येते.

वाचने 13385 वाचनखूण प्रतिक्रिया 25

स्पंदना Wed, 07/03/2013 - 04:23
ए दिल है मुश्किल जीना यहॉ। काय भन्नाट फोटोज आहेत. कलरकॉम्बेनेशन, प्रेझेंटेशन, अन फोटो काढताना दाखवलेली कल्पकता. पाककृती विभागाला एका वेगळ्याच पातळीवर नेलं आहे या प्रेझेंटेशन्सनी. तोंडाला पाणी सुटल ते वेगळच. त्याची तर बातच नको.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Wed, 07/10/2013 - 12:08
आज केली होती उकड. चित्रात दाखविल्याइतकी पांढरीशुभ्र झाली नाही. - कारण हिंग जास्त झाला असावा. ह्या पाककृतीत रव्याच्या उपम्या प्रमाणे बारीक चिरलेला कांदा घातला, फोडणीत उडीदाची + चण्याची डाळ घातली आणि पाण्याचे प्रमाण वाढवून २ वाट्या पाणी घातले तर अजून चांगली होईल असे वाटते. अर्थात, ती उपम्याच्या जास्त जवळ जाणारी असेल.

पैसा गुरुवार, 07/04/2013 - 13:34
आम्ही हळद आणि वरून कच्चं तेल घालून खातो.

दिपक.कुवेत Sat, 07/06/2013 - 11:34
आई पण हळद घालते. फोटो मस्त आलेत पण मला हा प्रकार अजीबात आवडत नाहि. कितीही उकडलं/काहिहि घातलं तरि नुसते उकडलेल्या तांदुळाच्या पीठाचे गोळे खातोय असं वाटतं.

In reply to by दिपक.कुवेत

कितीही उकडलं/काहिहि घातलं तरि नुसते उकडलेल्या तांदुळाच्या पीठाचे गोळे खातोय असं वाटतं.>> ज्याची त्याची आवड :) मला तर खूप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आवडते :) :)

In reply to by त्रिवेणी

अभ्या.. Sat, 07/06/2013 - 16:53
तुम्चि रास तुळ आहे का
असावी भौतेक. सगळं कसं मोजून मापून, लै हिशोब करुन असतं पण लोकांना लै जब्रा वाटतं. (च्यामारी तुळेचे असून पण आमचंच सादरीकरण कसं गंडतं हमेशा? ;( )

In reply to by अभ्या..

त्रिवेणी Sat, 07/06/2013 - 17:01
नका वाईट वाटून घेऊ. माझी रास पण तुळच आहे आणि पदार्थाचा मेकअप करणे मलापण जमत नाही.(बहुतेक स्वतःच्या मेकअप आवरता घेतला तर जमु शकेल असे वाट्ते).

अनन्न्या Sat, 07/06/2013 - 16:44
झटपट होणारी म्हणून उकड खूपदा केली जाते, पण इतकी घट्ट नसते. आणि साहित्याची मांडणी इतकी अप्रतिम की उकडीएवढा सोपा प्रकार वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय! मस्त!