श्री गुरुदेव दत्त
एक गृहस्थ आहेत. "पोलीस" ह्या "खात्यात" कामाला आहेत. शारीरिक उंची ५.३, बौद्धिक (तुम्ही ठरवा वाचून झाल्यावर)....वय ५०-५२ असेल, रंग ना काळा ना गोरा असा जो असतो तो, सरळ नाक, कुरळे केस, नाकावर चष्मा वगैरे. माणूस वागा बोलायला एकदम सोफ्ट. कायद्याचे विद्यापीठ असल्यागत बरीच कलमे मुखोद्गत. कसलेही व्यसन नाही
इमारतीमध्ये 'ए' विंग ते 'बी' विंग पर्यंत पसरलेली सदनिका इमारतीमध्ये सर्वांशी संबंध चांगले (मेंटेनन्स थकलेला नाही,गणपतीला भरपूर वर्गणी, एखादा शेलीब्रेटी आणून कार्यक्रम करणे,अक्कलकोट, शिर्डी चालूच असते वगैरे) आणि त्याही पेक्षा आज गुरुचरित्राचे पारायण संपून उद्यापन आहे जे दरवर्षी ना चुकता तो करतो.
मिसळपाव