Skip to main content

माझे सल्ले

लेखक सदासुखि यांनी शुक्रवार, 13/12/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ. पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!) सल्ला १- काहि बॉस उगाचच रागवत असतात(आणि रोजच) .

अत्तर

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 13/12/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते. काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले. बादशहांना पाहून सलाम करत होते. या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले. न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले. बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता. बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्‍याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा.

गाणं की खाणं?

लेखक बुडबुडा यांनी शुक्रवार, 13/12/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि.१२/१२/१३ पासून सुरु झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 'गानप्रेमी' रसिकांपेक्षा 'खाणं'प्रेमी रसिकच जास्त होते असं मला वाटत.पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिजे. जर या दोन्ही पैकी एकही गोष्ट होत नसेल तर गाजावाजा करण ठीक आहे. :P मध्यंतरामध्ये निवेदक काही जाहिराती वाचून दाखवत होते आणि माझ्या शेजारी बसलेल्या टिपिकल पुणेरी नाकात बोलणा-या कुटुंबातील एक जण 'वाह.. व्वा.. Heaven' अस ओरडला. आता जाहिरातीमध्ये याला काय भारी वाटले म्हणुन त्याच्याकडे बघितले तर महाशय थालिपिट खात होते..बर तो मराठी नसता..

('अ-विचारजंती'- एक विकृती - बद्धकोष्ठ विनाशाचा मार्ग)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 12/12/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे. आमच्या सारखे असंख्य लोक आंतरजालाच्या व्यासपीठाला मानणारे, लोकांच्या मते ह्याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकाविध विचारधारा एकत्र होण्याची इच्छा निर्माण झाली आणि आंतरजालिय लेखनाची सुरवात झाली.

समलैंगिकता- एक विकृती -विनाशाचा मार्ग

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 12/12/2013 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
समलैंगिक संबंधावर काही म्हणायचा आधी सृष्टीचीच्या प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर "बिग बैंग" पासून सृष्टीची निर्मिती प्रक्रिया सुरु आहे. निर्मितीसाठी विभिन्न तत्व दुर्घटनावश (वैज्ञानिक भाषा) एकत्र आले आणि आजची सृष्टी डोळ्यांसमोर आहे. आमच्या सारखे लोक असंख्य परमेश्वराला मानणारे लोकांच्या मते परमेश्वराच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. प्रथम माया आणि माये पासून या मायावी सृष्टीची निर्मिती झाली.

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस चौथा-पाचवा/भाग २

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 12/12/2013 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
======================= भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ ======================= दुपारची वामकुक्षी घेउन आम्हि फ्रेश झालो आणि मिनी सयाम बघायला बाहेर पडलो. मिनी सयाम म्हणजे प्रत्येक देशातील वर्ल्ड फेमस स्टॅच्यु/प्रतिक घेउन त्यांच्या छोटया प्रति बांधल्यात. येण्यार्‍या फोटोत त्या पुढे दिसतीलच. पण एवढया सगळ्या भाउगर्दित आपल्या भारताचं प्रतिनिधीत्व करणारं काहिचं नसाव ह्याचा खेद वाटला! १.

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट यांनी गुरुवार, 12/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

मेरे सामनेवाली खिडकी मे... ३

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 12/12/2013 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे मेरे सामनेवाली खिडकी मे... २ ********* या संपूर्ण कथेत माझ्या मनाची ब-याचदा द्विधा अवस्था झाल्याचं मला स्वतःलाच लेखन करताना लक्षात येतंय. आता, ओळख झाली, त्यात नंबरही मिळाला. मी समोरच राहतो म्हटल्यावर ती गोड हसली होती. त्यामुळे तिला पाहायची, तिच्याशी बोलायची इच्छा अजुनच बळावत चालली होती. पण त्याचवेळी आता किचनाच्या खिडकीतून तिला बघत बसण्यासाठी मन धजेना. मी आता कमालीचा धास्तावलो होतो. जर त्या रितेशऐवजी तिने मला तिला बघताना पकडलं असतं तर?? तसं तिनं एकदा पकडलंही होतं म्हणा.

दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 12/12/2013 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे. विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले, यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे.

आयुर्वेद मध्ये Infertility वर उपचार आहे का ?

लेखक komal.tejas यांनी गुरुवार, 12/12/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मध्ये लिहायचा माझा पहिलाच प्रयन्त आहे. मला (खरे तर आम्हाला ) माहिती पाहिजे आहे कि Infertility साठी आयुर्वेद किती फायद्याचे आहे? आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. (बघून कोणाला तसे वाटणार नाही इतके तरुण आहोत अजून ;)) मुलासाठी पर्यंत चालू आहेत पण अजून यश नाही. डॉक्टर IUI आणि IVF सांगत आहेत. पण मला त्याची भीती वाटते. मला जाणून घ्यायचे आहे कि आयुर्वेद मध्ये उपचार केले तर किती वेळ लागतो? पुणे (पिंपरी चिंचवड असेल तर उत्तम) ला चांगले आयुर्वेदिक क्लिनिक आहे का? सध्या तरी इतकेच लिहते? कदाचित मला काय लिहायचे आहे ते नीट लिहिले नसेल तर समजून घ्या?