Skip to main content

नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

लेखक संतोषएकांडे यांनी सोमवार, 24/03/2014 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात.

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/03/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती. तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे.

लग्न पाहावे करून

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 23/03/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?

पवारांची विचार"पूस"

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 23/03/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्‍यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे! अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १० : बांतीय साम्रे, प्रे रुप, प्रसात क्रावन आणि कंबोज नृत्य-संगीत-रजनी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 23/03/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 23/03/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

देव पाहिलेला माणूस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/03/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/03/2014 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
१) राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. एक व्यक्ती नगरसेवक म्हणून अथवा सहकारी संस्थेतीतल पदावर १० वर्षे, विधानसेभेत १० वर्षे लोकसभेत १० वर्षे राज्यसभेत १२ वर्षे राहीली तर जवळ पास ४२ वर्षांचे किमान करिअर करता येऊ शकते. खूपच लोकप्रीय असेल तर जवळपास ५७ वर्षाचे करीअर करता येऊ शकेल. सांगण्याचा उद्देश एवढाच कि ज्यांना करिअर करायचे आहे त्यांना पुरेशी संधी राहते आणि इतरांनाही पुरेशी संधी मिळते.

ओसाडवाडीचे ईलेक्शन..

लेखक नानासाहेब नेफळे यांनी रविवार, 23/03/2014 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच विषयाभोवती फिरायचा. गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं, तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते.

पाक-कला - अननसाचा शिरा (पाईनॅपल)

लेखक प्रमोद्तम्बे यांनी रविवार, 23/03/2014 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
अननसाचा शिरा (पाईनॅपल) साहित्य : दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर (अननस जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड. कृती : एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घ्या.