यापैकी कोणीही नाही! NOTA
लोकसभा निवडणुका लवकरच येत आहेत आणि यावेळी पहिल्यांदाच मतदान करताना आपल्याला मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय अधिकृतपणे निवडण्याची संधी मिळणार आहे.
२००९ मध्ये निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची (निवडणुक आयोगाची) मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय देण्याची तयारी आहे, जे सरकार सहसा मान्य करत नाही. २७ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मतदान पत्रिकेवर मतदारांसाठी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय असणे गरजेचे आहे, ज्यामुळे मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतला सहभाग वाढु शकतो.
मिसळपाव