कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची
मार्च महिना सुरु झाल्या बरोबरच सौ.चे उपद्व्याप सुरु होतात. आलू चिप्स, बटाटे-साबूदाण्याचे पापड आणि मुगोड्या इत्यादी प्रकार करण्याची तैयारी आणि त्या साठी आमच्या सारख्या हक्काच्या गुलामांचा वापर ही होणारच. तसे म्हणाल तर या वर्षी हिवाळा थोडा जास्त वेळ राहिला. तरी ही होळी नंतर आकाशमधून मधून स्वच्छ राहते. होळी नंतर ४ दिवसांची सुट्टी घेतली, थोड आराम करावा म्हणून. पण घरी नवरा सुट्टीवर असेल तर त्याला कसे कामात गुंतवून ठेवावे जेणेकरून सुट्टी घेण्याच्या फंदात पडणार नाही. झाले ही तसेच. या सुट्टीत सर्वात आधी केलेला पदार्थ म्हणजे मुगोड्या. बाजारात जाऊन मुगाची डाळ विकत आणली सौ.ने निवडून भिजत घातली.
मिसळपाव