Skip to main content

सदिच्छा : शुद्धी, वृद्धी, शुद्धी !!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 31/03/2014 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
हा गुढी पाडवा तुमचे - भाग्य वृद्धी, संकल्प सिद्धी, मन शुद्धी, धन वृद्धी, कर्म शुद्धी, कर्म वृद्धी, कर्म सिद्धी - करणारा ठरो हीच सदिच्छा !!

पडघम २०१४- भाग २: क्रिटिकल मास

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 31/03/2014 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात आपण दुरंगी, तिरंगी किंवा चतुरंगी लढती होत असलेल्या राज्यांमध्ये बऱ्यापैकी (किमान २०%) जागा मिळविण्यासाठी किती टक्के मते लागतात हे बघू. कोणत्या परिस्थितीत एखाद्या राज्यात दुरंगी/तिरंगी किंवा चतुरंगी लढत आहे असे मी म्हणतो हे लेखामध्ये स्पष्ट होईलच. दुरंगी लढतीमध्ये मी खालील दोन परिस्थितींचा अंतर्भाव करत आहे. एखाद्या राज्यात दोन मुख्य पक्ष/आघाडी यांना एकूण ९०% च्या आसपास मते मिळत असतील तर त्या राज्यांमध्ये मी ’थेट दुरंगी’ लढत आहे असे म्हणतो (उदा. १९८९,१९९१,१९९६ आणि २००९ मध्ये केरळ,१९८९ आणि १९९६ मध्ये पश्चिम बंगाल, १९९८ चा अपवाद वगळता गुजरात).

आठवणी शिक्षेच्या

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 31/03/2014 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
शालेय जीवनातील काही शिक्षा आठवल्या ....इयत्ता ६ वी ... (शिकवलेला धडा)-अस्मादिकांची जाहीर शंका ?? ....नतीजा १. (गांधीजी देशाला वडिलांसारखे त्यामुळे त्यांना 'राष्ट्रपिता')-मग राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा नवरा ?? ...बाकावर उभा दिवसभर २. (सर्व मुलींना बहिणीचा मान द्या..त्या तुमच्या बहिणी आहेत) - मग मोठेपणी आम्ही लग्न कुणाशी करायचे ?? ... २ दिवस वर्गाबाहेर उभा ३.

विपश्यना साधकवीर परतले

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 31/03/2014 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ५ विपश्यना साधकवीर परतले दुपारची वेळ. ‘मी गाडीत आहे. साधारण 4ला घरी पोहोचेन’ म्हणून पत्नीच्या सेल फोनवर साहेबांचा निरोप आला आणि घरच्यांची लगबग सुरु झाली. गेले 12 दिवस घरी मरगळून पडलेला सेल फोन आता मालक कामाला लावणार असे वाटून चार्जिंगला चढला. कारण ही तसे जबरदस्त होते. बरेच दिवस गाजत असलेले विपश्यना केंद्राचे काम पेंडिंग होते, ते करून साहेब परतणार होते. मुले मुद्दाम सुट्टी काढून घरी वाट पहायला आली होती. मुलगी ‘डॅड कसा दिसतोय? हाडकला कि काय?

काजू अक्रोड कतली

लेखक टक्कू यांनी रविवार, 30/03/2014 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या गुढीपाडवा! नवीन वर्ष नवी आशा नवी सुरुवात. मागच्या गुढीपाडव्याला मी टक्कू हा माझा पाककृती ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता तो एक वर्षाचा झाला. येत्या वर्षी हा ब्लॉग अजून चविष्ट आणि स्वादिष्ट बनवण्याचा माझा मानस आहे. हाच मानस समोर ठेवून नवीन वर्षाची सुरुवात आपणासोबत एक नवीन गोड पदार्थ ठेवून करतेय. ही एक हटके प्रकारची कतली आहे. दोन पदार्थांचा बेमालूम संगम मी एका बर्फी मध्ये केला आहे आणि खरंच ते अप्रतिम झालंय. आपल्या सर्वांची आवडती काजू कतली .... आणि त्याच्या जोडीला अक्रोड हलवा!

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 30/03/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी ) विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का?

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ३

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 30/03/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन स्मॉलीच आणि अ‍ॅलन पेनींग्टनच्या मृत्यूने हादरलेल्या अमेरिकन तुकडीने मोहीम आवरती घेतली आणि बेस कँप सोडला. त्यांच्यापाठोपाठ मिचेल पार्मेंटिअरने स्कार्डूची वाट पकडली. बेस कँपवर असलेल्या पाकीस्तानी अधिका-यांनी मारी अब्रेगो आणि जोसेमा कासिमीरो यांना विनापरवाना अ‍ॅब्रझी स्परने चढाई केल्याबद्दल ताब्यात घेतलं होतं ! अर्थात यामागील हेतू बेस कँपवरुन इस्लामाबादला सटकण्याचा आणि गिर्यारोहकांकडून पैसे उकळण्याचा होता हे उघड होतं. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेतील गिर्यारोहकांची प्रगती फारच धीम्या गतीने सुरू होती.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १२ : न संपणारी स्थापत्यमालिका

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 29/03/2014 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६...

गुळांबा

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 29/03/2014 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कैरीचा कीस दोन वाट्या, गूळ चार वाट्या, वेलची पावडर, लवंगा दोन तीन. कृती: कैय्रा धुऊन साले काढून घ्यावीत. साले काढलेल्या कैय्रा किसाव्यात. किसाच्या दुप्पट गूळ घेऊन तो किसलेल्या कैरीत मिसळावा. दोन तास मिश्रण झाकून ठेवावे. दोन तासानंतर गूळ विरघळला की लवंगा घालून मिश्रण गॅसवर कढवायला ठेवावे. मिश्रणाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. थेंब पसरत नसेल तर गुळांबा तयार झाला असे समजावे. तयार गुळांब्यात वेलची पावडर मिसळावी. या गुळांब्याला वेळ कमी लागतो. गूळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करावे. त्यासाठी गूळ एकत्र करून ठेवलेल्या मिश्रणाची गॅसवर ठेवण्यापूर्वी चव पहावी.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - २

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 29/03/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
१९८६ १९८६ च्या चढाईच्या मोसमात के २ वर चढाईच्या दृष्टीने अनेक गिर्यारोहकांनी पाकीस्तान गाठलं होतं. वेगवेगळ्या वाटांनी के २ च्या माथ्यावर चढाई करण्यासाठी पाकीस्तान सरकारने अनेक मोहीमांना परवाने दिलेले होते. अ‍ॅलन रोझच्या ब्रिटीश मोहीमेचा त्यात समावेश होता. रोझ एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. १९८० साली मायकेल वॉर्ड आणि सुप्रसिध्द गिर्यारोहक क्रिस बॉनींग्टन यांच्यासह त्याने चीनमधील अनेक शिखरांवर चढाई केली होती. १९८० मध्ये थंडीच्या मोसमात रोझच्या नेतृत्वात ब्रिटीश तुकडीने पश्चिम धारेवरून एव्हरेस्टवर चढाईची मोहीम आखली होती. मात्र एव्हरेस्टचा माथा गाठण्यात त्यांना यश आलं नाही.