Skip to main content

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

लेखक म्हैस यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे . इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते .

आयला या बायका म्हणजे......हुS श

लेखक आंबट चिंच यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्‍यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्‍याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो. आहा हा रविवार सार्थकी लागणार असं वाटत होतं) आल्यावर एवढी वाफेच्या इंजिनासाअरखी चेहरा लाल *blush* करुन खदखदत का होती, कुणास ठाउक (गेला संपुर्ण रविवार डबडयात गेला).

बघता बघता देवा -

लेखक विदेश यांनी बुधवार, 05/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कालपर्यंत कितीतरी खुषीत तू ठेवलेस - बघता बघता देवा, आज मात्र भुईत लोळवलेस . . हिरवेगार शेत सारे सोन्यासारखे पिकवलेस - बघता बघता देवा, सगळे का रे धुळीत मिळवलेस . . का रे देवा आम्हाला इतके तू छळलेस - बघता बघता देवा, पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . . घ्यायचे होते सगळे परत आधी इतके का दिलेस - बघता बघता देवा, आम्हाला कफल्लक का केलेस . . इतके दिवस तुझे कौतुक करायला लावलेस - बघता बघता देवा, आता बोट मोडायला लावलेस . . खेळ कसला जीवघेणा पावसाला रे धाडलेस - बघता बघता देवा, आम्हाला मातीमधे गाडलेस . . ! .
काव्यरस

मुक्तविहारींची भाषणभरारी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 04/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

सिडनीस्थित मिपाकर आहेत का कुणी?

लेखक नानबा यांनी मंगळवार, 04/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार. शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय. पण अभ्यास आणि कॉलेजनंतर गप्पाटप्पा मारण्यासाठी, सुट्ट्यांच्या दिवशी भेटीगाठी करण्यासाठी कोणी आपलं मिळालं तर त्याचा शोध घेतोय. आहे का कोणी मिपाकर सिडनीत? माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत. त्यांपैकी कोणी मिपाकर असल्यास मला संपर्क करा.

मी तुझा चंद्र झालो

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 04/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे. म्हणजे काहीच्या काही कविता आहे. त्यामुळे ह्या कवितेला "काहीच्या काही", "फालतू", "बंडल", "दर्जाहीन", "अभिरुचीहीन" यापैकी काहीही समजावे ;) - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मी तुझा चंद्र झालो.... केव्हा काय विचारतेस? तोंड धुता धुता हळू हळू मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही तेव्हाच...
काव्यरस

खिचडी बिघडली - विडंबन

लेखक नेत्रा वैद्य यांनी सोमवार, 03/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडल्याचं एक गाणं हरीच्या नैवेज्ञाला केली जिलबी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ नेऊन वाढलं पंगतीत, जिलबी बिघडली त्यातला घेतला थोडासा पाक त्याचा केला साखरभात नेऊन वाढला पंगतीत, जिलबी बिघडली ह्या गाण्याचं विडंबन : आषाढी एकादशीला केली खिचडी बिघडली त्यातला घेतला एवढासा गोळा त्याचे केले वडे सोळा तळून काढले तुपात, खिचडी बिघडली त्यातलं घेतलं एवढंसं पीठ त्याचं केलं थालीपीठ खरपूस भाजले तव्यावर , खिचडी बिघडली त्यातली घेतली एवढीशी खिचडी त्याची केली कुर्डई-पापडी तळून काढली तेलात, खिचडी बिघडली

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 03/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com नमस्कार, कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ५वे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास २०० कवींनी यात सहभाग घेतला आहे.

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 03/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी : बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले. मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

स्ट्फ्ड मटार पराठे

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे. १ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत) १-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता) १/४ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) १/२ टीस्पून जीरेपूड मीठ चवीप्रमाणे १-२ टेस्पून बेसन बारीक चिरलेली कोथींबीर