Skip to main content

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

लेखक प्यारे१
Published on मंगळवार, 01/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

लेखक drsunilahirrao
Published on मंगळवार, 01/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
भर्जरी दुःखात होतो नेहमी मी तुझ्या कर्जात होतो नेहमी शोधिसी आता मला दुनियेत या मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी तू जरी केले न दिसल्यासारखे मी तुझ्या लक्षात होतो नेहमी आसवे उबदार तू मजला दिली मी असा श्रीमंत होतो नेहमी ! तू जरी रस्ताच माझा सोडला मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी ! मी जरी पापी न होतो फारसा पण तिथे स्वर्गात होतो नेहमी मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी हातच्या रेषांत होतो नेहमी ! डॉ.सुनील अहिरराव

' दे टाळी ' - ' घे टाळी '

Published on मंगळवार, 01/04/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द ) लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का? आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो ' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी' दे विडा आणि शेवटी खा . ' किडा ' असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो ) मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.

वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

लेखक प्रचेतस
Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम
अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल.
होळीच्या तीन दिवस आधी मित्राबरोबर गप्पा टप्पा चालू असता अचानक वेरूळच्या सहलीची योजना आखली गेली आणि होळीच्या आदल्या दिवशी पहाटे आम्ही पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने प्रस्थान केले.

अशीच एक फँटसी..(२)

लेखक सस्नेह
Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
अशीच एक फँटसी..(१) सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल.

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ४

Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
३ ऑगस्ट कोरीयन मोहीमेतील तीन गिर्यारोहक किम चँग सून, जँग बाँग वान आणि जँग ब्याँग हो भल्या पहाटे कँप ४ वरून निघून शिखराच्या मार्गाला लागले होते ! के २ वरील लहरी हवामान आता बिघडत चाललं होतं ! पहाटेपासूनच वा-याचा जोर वाढत होता. शिखराच्या आसपास असलेल्या ढगांमुळे ते मधूनच दिसत होतं तर मध्येच ढगांत गडप होत होतं ! नैऋत्येच्या दिशेने ढगांचा पुंजका के २ च्या दिशेने झेपावत होता ! याचा अर्थ सरळ होता.

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
माझं कोकणातलं गांव :- भाग-४ मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे..... तिथुन पुढे >>> दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु.

FoodieMagic.com चा शुभारंभ

लेखक मनिष
Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल.

सदिच्छा : शुद्धी, वृद्धी, शुद्धी !!

Published on सोमवार, 31/03/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
हा गुढी पाडवा तुमचे - भाग्य वृद्धी, संकल्प सिद्धी, मन शुद्धी, धन वृद्धी, कर्म शुद्धी, कर्म वृद्धी, कर्म सिद्धी - करणारा ठरो हीच सदिच्छा !!