वाट्सअॅप एक डोकेदुखी ?
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल. एका मोठ्या माणसाने असं म्हटलं होतं की ''How You manage your information determines whether you win or lose'' आपण आपल्याकडील माहितीचं व्यवस्थापन कसे करतो त्यावरच आपलं यश अपयश अवलंबून असते. माहिती विचारांची देवाण-घेवाण हा सर्व प्रकारच्या विकासाचा आधार असतो. आणि म्हणून आपल्याला सतत माहितीच्या-संवादाच्या क्षेत्राशी सतत जोडलेलो असले पाहिजे असे वाटायला लागते.
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
वाट्सॅप हे स्मार्टफोनवरचं Android वरील लोकप्रिय अॅप्लिकेशन. (नै सर आता टेलीग्राम जोरात चालतंय असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. वाट्सअॅपवर एकदा आपल्याला संदेश यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही वाट्सॅपवर यायला लागल्या. विविध गृप निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे.
उदाहरण म्हणुन सांगतो. आमचा एक गृप होता विविध राजकारणी, नगरसेवक, व्यापारी,शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य,आमदार, असा गच्च थोरामोठ्यांनी भरलेला गृप होता. सुरुवाती सुरुवातील गुड मॉनिंग पासून 'गोड गोड' असा संवाद व्हायचा. टोन वाजला की काय लिहिलं त्याची प्रचंड उत्सुकता. वाचने लिहिणे सुरु झाले. मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या. एक दिवस अॅडमिनने हा गृप बंद करत आहे असे सांगितले. आणि सुटलो. पण एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार.
वाट्सअॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ संदेश म्युट करा, कोणी म्हणेल सरळ अॅप्लीकेशन भ्रमनध्वनीतून काढून टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना ब्लॉक करा, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच.
विनंती : आमच्याकडे वाट्सअॅप नाही, हलके भारीतले मोबाईल नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे. :)
''अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। श्री संत ज्ञानेश्वर.
वाचने
33513
वाचनखूण
प्रतिक्रिया
78
वाट्सअॅपवर सर्वच वाईट नाही.
व्हॉट्स अप हा काय प्रकार आहे?
In reply to व्हॉट्स अप हा काय प्रकार आहे? by नानासाहेब नेफळे
व्हॉट्स अप हा काय प्रकार आहे?
In reply to व्हॉट्स अप हा काय प्रकार आहे? by भाते
अरे ये पीएसपीओ नही जानता!
अनेक ठिकाणी पसरलेल्या
हम्म्म....
सद्यस्थितीत वाट्सअॅप हे २०%
In reply to सद्यस्थितीत वाट्सअॅप हे २०% by किसन शिंदे
धन्यवाद
वरदान!
In reply to वरदान! by साती
+१
In reply to +१ by गणपा
+११११११
In reply to वरदान! by साती
+१००० अगदी असंच !!
कुठलेही तंत्रज्ञान स्वतः
५०-५०
In reply to ५०-५० by पैसा
अगदी.
In reply to ५०-५० by पैसा
हेच म्हणतो..
व्हाॅट्सअॅप मुळे खुप जुने
In reply to व्हाॅट्सअॅप मुळे खुप जुने by जोशी 'ले'
+१
इथेच टाका
माझ्यासाठी हे अॅप फारच
एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणारअशीच भांडणं व्हॉटसअॅप, बागेत, कट्ट्यावर किंवा ऑनलाईन फोरम/साईटवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या केसमधे अॅपपेक्षा जास्त प्रॉब्लेम, गॄप युझर्सचा होता असं वाटलं. बरं झालं, बंद केलात तो गॄप.आपण इ मेल जसे दिवसातून एकदा
मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा
In reply to मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा by काळा पहाड
प्रतिसाद आवडला. आणि पटला.
In reply to मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा by काळा पहाड
बुल्स आय!
मी पहिल्यांदा जेंव्हा हे अॅप
तसं एक बरं अॅप आहे. पण बर्
In reply to तसं एक बरं अॅप आहे. पण बर् by प्रचेतस
हे कसे करायचे ते सांगा...
In reply to हे कसे करायचे ते सांगा... by धन्या
अजून तुम्ही माझ्या वॉट्स अप
If you are bad, then I am your dad...!
In reply to If you are bad, then I am your dad...! by आत्मशून्य
बाबौ!
In reply to If you are bad, then I am your dad...! by आत्मशून्य
जर...
In reply to जर... by विकास
???
टाईम छान कटतो !
अश्लीलतेला ऊत आलाय ...
बाकी सगळं जौ द्या पण बरेचसे
In reply to बाकी सगळं जौ द्या पण बरेचसे by प्यारे१
हा हा हा, हे मात्र एकदम खरे!
संस्थळावर परिणाम
In reply to संस्थळावर परिणाम by पैसा
जाऊन्द्याहो
In reply to जाऊन्द्याहो by प्रसाद गोडबोले
असं म्हणता?
In reply to संस्थळावर परिणाम by पैसा
काही नग वॉट्स अॅपवर मिपा
In reply to संस्थळावर परिणाम by पैसा
>>>तिथे दिवसभर मिपा + संपादक
In reply to >>>तिथे दिवसभर मिपा + संपादक by मारकुटे
अरेच्चा!
In reply to अरेच्चा! by प्यारे१
अर्रर्ररर्र सिक्रेट फोडलं का?
In reply to अर्रर्ररर्र सिक्रेट फोडलं का? by मारकुटे
कुणाचं कुणाचं?
हेच म्हणतो..
मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा
मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा. सदस्यांचे दुरध्वनी क्रमांक आहेत त्याच्या माझ्या पुरता एक ग्रुप बनवला आहे पण अजुन पर्यंत एकाला पण निरोप पाठवलेला नाहीये. मि.पा. चा पण व्हॉट्स अॅप ग्रुप आहे हे माहिती नव्हते. त्या साठी कोणाला व्य.नि. करायचा.
In reply to मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा by प्रमोद देर्देकर
अधिकृत ग्रुप नाय ओ!
In reply to अधिकृत ग्रुप नाय ओ! by पैसा
>>>लोकांनीच आपापल्या
In reply to >>>लोकांनीच आपापल्या by प्यारे१
कसंही वाचा
In reply to अधिकृत ग्रुप नाय ओ! by पैसा
तिथे असो वा इथे, सगळीकडे
मी कोणत्याच ग्रुप मध्ये नाही
वॉटसप फोन नंबरवर अवलंबुन आहे
लास्ट सीन अॅट व्हॉट्सप ...
ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी
In reply to ज्या गोष्टींपासुन डोकेदुखी by मारकुटे
आणि सरांची सारखी काळजी करायची
In reply to आणि सरांची सारखी काळजी करायची by बिपिन कार्यकर्ते
बिपिनदा प्रतिसाद आवडला.
In reply to आणि सरांची सारखी काळजी करायची by बिपिन कार्यकर्ते
दोन मोठी माणसं बोलत असतांना
In reply to दोन मोठी माणसं बोलत असतांना by मारकुटे
सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत
In reply to सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत by किसन शिंदे
सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे
In reply to सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे by मारकुटे
शहाणे होणार नाहीत याचीखात्री
I fear the day that
वाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर अशा
योग्य वापर केल्यास त्रास नाही
सामना आणि राशिभविष्य
मलहि अगदि असाच अनुभव आला आहे.
चला व्हॉट्स अप न आवडणाऱ्याचा
In reply to चला व्हॉट्स अप न आवडणाऱ्याचा by खबो जाप
@ एक ग्रूप बनवू आपण (व्हॉट्स
सर्वात मजा तेव्हा येते जेव्हा
नवं काही आलंय का ?
In reply to नवं काही आलंय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला स्त्रीयांचे
In reply to महिला स्त्रीयांचे by आजानुकर्ण
सॉरी सेठ.
In reply to सॉरी सेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चहा टाक ऑफिसातून निघालोय.
In reply to चहा टाक ऑफिसातून निघालोय. by आजानुकर्ण
हाहा
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रात्री उठून पहावे लागावेत
In reply to महिला स्त्रीयांचे by आजानुकर्ण
असतात ! असतात !!
In reply to नवं काही आलंय का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्री एसेमेस आहेत त्यात भागतं.
माझं म्हणाल तर मी वैतागलोय
व्हॉट्सअॅप आता डेस्कटॉपसाठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }