Skip to main content

तू गेलीस तेव्हा...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 29/05/2014 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो.. सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो.. तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो.. गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो.. तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..

सेकंड होम...

लेखक saumitrasalunke यांनी गुरुवार, 29/05/2014 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे... मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 29/05/2014 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्‍या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत. माझ्यासहीत बहुतांश सर्वसामान्य व्यक्तींकरता हे घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या कायदेविषयक मर्यादा संभ्रमात टाकणार्‍या असतात. या दृष्टीने घटना आणि कायदेविषयक दृष्टीने अधिक चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. चर्चेस सुरवात म्हणून खाली काही दुवे देतो आहे.

<बरं मग>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/05/2014 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल.

नाटेठोम

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 29/05/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सुट्टी झ्याक. राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ. दिवसभर आंबे, खेळ. अब्यास न्हाई. मार न्हाई. घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं. त्यांच्यासंग शुद्ध बोलते. अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत. मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे. ‘क्याट’ म्हनत्येत त्येला. खेळतात ती समदी. त्यादिशी बगत बस्ली. सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली. अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”. मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला. मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला. म्या इचारलं “नाटेठोम?

बर मग?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 29/05/2014 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
"अभिनंदन.." धन्यवाद "पार्टी पाहीजे" कसली? "कसली म्हणजे काय. ५८ चे ८५ ची पार्टी मिळालीच पाहीजे" अरे ़ज्याला मिळाले तो म्हणतो "सो व्हॉट" तर मी उगाच कशाला नाचु गावभर. "़कमाल आहे. बोर्डावर अधोरेखीत नोंद आहे शाळेत. मॅड्मनी ़़खास उल्लेख केला. तुला बोलला नाही" नाय बॉ. "़कमाल आहे.पुढे काय? सायन्स?" बघु. अजुन काय ठरले नाही. "तू काय ठरवलयस"? ठरवणारा मी कोण? "९० हुकल्याचे फ्रस्ट्रेशन वाट्तेय मला" अरे हट बे. ९५ आले असते तरी धिरुभाई बोलवणार होता का असे मी नाही तो म्हणतोय. "ंमग प्रश्नच खुंटला. माझ्याने घराण्याचे नाव ़काढले. ९२.३५. दोन मार्काने शाळेतला पहीला नंबर चुकला.

ग्वॉकोमोली (Guacamole)

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 29/05/2014 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
ग्वॉकोमोली हे एक मेक्सिकन डिप आहे. हे तुम्ही चिप्सबरोबर किंवा टोस्टवर लावुन किंवा सँडविच मधे स्प्रेड म्हणुन सुद्धा वापरु शकता.

चर्चा बेलबॉण्डची

लेखक माहितगार यांनी बुधवार, 28/05/2014 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे समर्थन सहसा कुणीच करत नाही. आर्थीक गैरव्यवहारांचे घोटाळ्यांचे आरोप आणि जबाबदारीचा उल्लेख करण्या साठी लागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संबंधीत आरोपीत व्यक्तींची हकनाक बदनामी होणार नाही ह्याचे पथ्यपाळण्याचा समतोल ह्याचे कायदेविषयक पैलू वेगळ्या धाग्याचा विषय आहे. ज्या व्यक्तीला आपल्यावरील आरोपांमुळे आपली बदनामी होते आहे असे वाटते त्या व्यक्तीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे सहाजीक आहे त्या व्यक्तीपाशी दुसरा काही मार्गही नाही. त्या करता दिवाणी आणि फौजदारी असे दोन पर्याय आहेत.

माझं सिंगल पॅरेंटिंग

लेखक सावत्या यांनी बुधवार, 28/05/2014 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस.

झुंज मराठमोळी - मराठीची खांडोळी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 28/05/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले. तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो.