Skip to main content

रायआवळ्याचे सरबत

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 29/04/2014 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
sarbat साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी. कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे. उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली. अगदी कैरीच्या पन्ह्यासारखे लागते. sarbat

वाचने 9241
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

जीवघेणे फोटो आहेत. तोंपासू. कधी चुकून दिसलेच रायआवळे इकडच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये तर करून बघेन.

अती झालेले आवळे शेवटी टाकुन दिले! आणि तू सरबताची कृ टाकलीस !! मी आवळे उकडून घेते.आणि गरात आलं,मीठ्,साखर घालुन मिक्सरमध्ये फिरवुन घेते.

In reply to by अजया

वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते. बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते. काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली. सुरेख अनन्न्या!

लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

अनन्या सरबत मस्तच आहे. मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

आवळे इतके फुकट जाताना पाहून चैन पडेना! पण सरबत एकदम आवडले सगळ्याना, आता आवळे संपेपर्यंत रोज ताजे मस्त सरबत! सर्वांचे आभार!

मस्तच ! :) बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

मस्त ग. तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.