Skip to main content

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/06/2014 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात.

शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 17/06/2014 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! जमिनीचा नकाशा जमिनीचा नकाशा मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे. जमिनीसंबंधित तथ्ये:
  1. जमिनीचा आकार सुमारे १२ एकर आहे. (नकाशात दाखविल्याप्रमाणे निळ्या रेषेची चतुःसीमा)
  2. गावापासून ही जमीन एक- दीड किमी अंतरावर आहे.
  3. मुख्य रस्त्यापासून जमीन २५० फूट अंतरावर आहे.

माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 17/06/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची... तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची.... वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही.. सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही.. डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे.. वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे... साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा... अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा... तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १ तुझं.. माझं..

अविस्मरणीय ग्रीस !!

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 16/06/2014 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
फेब- मार्च मध्ये नेदरलॅड्स ट्रिपबद्दल मैत्रीणीशी बोलत असताना ग्रीसला कधीतरी जायची इच्छा आहे असे म्हटले होते तेव्हा समजले की मैत्रीणीला ही तिथे जायचे आहे मग काय आम्ही लगेच ग्रीसबद्द्ल माहिती गोळा करु लागलो.

एका निरोप-समारंभाचे आउटसोअर्सिंग

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 16/06/2014 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ हापिसच्या पाठीमागचा जनरल हॉल. वेळ संध्याकाळी साडेपाच. प्रसंग धायगुडेसाहेबांचा सेवानिवृत्ती निरोपसमारंभ. हॉलच्या एका टोकाला दोन टेबले एकमेकांना जोडून त्यावर चादर घातली होती . त्यामागे सहासात खुर्च्या मांडून व्यासपीठ बनवले होते. टेबलावर दोन बिसलेरी आणि एक फुलदाणी. फुलदाणीत फुलांऐवजी हापिसच्या पुढच्या बागेतील चार शोभेच्या झाडांच्या हिरव्याजांभळ्या फांद्यांचे शेंडे खुडून घालून ठेवले होते. कुणीतरी त्यात, सत्कारासाठी आणलेल्या हारातली दोन शेवंतीची पिवळी फुले मधेच खोचली होती.

महाराष्ट्रातील पाणि व्यवस्थापन आणि सिंचनाच्या समस्यांचा मान्सून

लेखक माहितगार यांनी सोमवार, 16/06/2014 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
गोदावरी नदीचा इतिहास अभ्यासताना गौतम ऋषिंनी गोदावरीचा प्रवाह महाराष्ट्रात आणण्यापुर्वी म्हणे २१ दुष्काळ पडले हि झाली आख्यायीका, पण नवीनतम हवामान पुरातत्व संशोधनांनुसार भारतातील दुष्काळांचा इतिहासही सिंधू संस्कृती इतकाच जुना म्हणजे चार साडे चार हजार वर्षे पर्यंत मागे जातो आहे असे दिसते; हा झाला प्राचीन इतिहास. अलिकडच्या इतिहासाकडे पाहीलतरी आधून मधून दुष्काळ हे महाराष्ट्राच्या पाचवीला नेहमीच पुजलेले.

तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

लेखक माहितगार यांनी रविवार, 15/06/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही.
काव्यरस

मनः सामर्थ्य

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 15/06/2014 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच.