Skip to main content

नाटक...

लेखक psajid यांनी शनिवार, 01/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली
लेखनविषय:

वाचने 1660
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! व्वा, क्या लिखते हो जनाब| बहोत खूब!! अपेक्षा भंगाचे दु:ख खरोखरीच खूप मोठे असते. मला तर नेहमीच वाटते: "खुद को कर बुलंद इतना कि खुदा भी आकर पुछे, कि बता तेरी रजा क्या है?"

छान