Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 27/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१३ मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! ============= हुश्श्स्श्स.......! आणि फोटोंच्या कचाट्यातून कसाबसा एकदाचा तो कान-पिळून होतो.आणि गाडी म्होरल्या ठेसनात येते..ती सप्तपदीच्या! हा मात्र दोन्ही बाजुच्या सर्व आज्जी-बायांचा अत्यंत कौतुकाचा शीन बरं का! इथे येणारे (आनंद)अश्रूही खरे! दोन्ही हात उंचाऊन लांबूनच दिले गेलेले आशिर्वादही खरे. आगदी मंत्रांशिवाय केला हा विधी तरी चालेल...असं माझ्या सारख्याला वाटणारा हा विधी आहे.

वर्धमान ते महावीर

लेखक दशानन यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सुवर्णमयी पालखीतून मुलायम असा गौरवर्णीय हात बाहेर आला, व पालखी जागेवरच थांबली. पालखीतून तो खाली उतरला, नगर खूप मागे राहिले होते, समोर हिरवेगार जंगल दोन्ही हात पसरून जसे याच्या स्वागतासाठी उभे होते.. पश्चिमेला मावळत असलेल्या सूर्याला त्याने मनलावून नमस्कार केला व मागे वळून त्याच्या मागोमाग आलेल्या जनसमुदायाला देखील विनम्रपणे नमस्कार केला. आपल्या जन्मभूमीला वंदन केले आणि अंगावरील दागिने एक एक करून काढून बाजूच्या दगडावर ठेवले, शरीरावरील रेशमी, राजेसी वस्त्रे तेथेच त्याने काढून ठेवली. चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवताना सहजच हात कानापाशी थबकले...

(चतुर) भ्रमणध्वनीच्या गमतीजमती…

लेखक भाते यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली. माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.

टोलनाक्यावर...

लेखक गवि यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मी टोलनाक्यावर उभा असतो. हौसेने नाही राहात. टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब. मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल. उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात. पण मी टोलनाक्यावर उभा असतो. .. तसा मी ब्राह्मणाचा. अण्णाआईसोबत चांगला होतो. अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत. आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली.. मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं. अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर. मग वर्षं वर्षं. एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली..

(तमाशा)

लेखक धन्या यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: गोंधळ साल्या तू बेवडा मारताना तुझे डोळे फार तांबारुन जातात सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर आणि जळमटं पकडलेल्या गंजलेल्या खिडकीतून दिसणारा तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- साल्या तू बेवडा मारताना बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस भरभर शिव्या बाहेर येतात बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात तुझ्या हेलकावे खाणार्‍या शरीराकडे पाहतात मग त्यांचाही डोलकर होतो, आणि सगळाच शिमगा आणि मग सगळ्याचा कसा उगाचंच त

गोंधळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सखे तू जवळ नसतांना तुझे डोळे फार गोंधळ घालतात सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं ------ गोठलेल्या शाईसारखी काळी रात्र आणि थंड पडलेल्या इवलाश्या खिडकीतून दिसणारी ती लोभस चंद्रकोर... तुझ्या डोळ्यांचा आभास निर्माण करतात आणि मग फार गोंधळ होतो... सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना बघता बघता कोर्‍या कागदाची कविता होते झरझर लेखणी शब्द पाझरते... कविता तुझे वर्णन करायला लागते तुझ्या डोळ्यातल्या अगणित छटांमध्ये गुरफटते मग तिचाच गोंधळ होतो, आणि सगळीच आंधळी कोशिंबीर होऊन बसते नुसताच गोंधळ, आणि मग सगळचं कसं विनाकारण उत्कट होत जातं -------- सखे तू जवळ नसतांना माझा सगळाच नाईलाज अ

सिग्नल - लघुकथा

लेखक विशाल चंदाले यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली. ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं?

सप्ताहिक सकाळ-२ लेख!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत. माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते.

मैत्रीण

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 26/08/2014 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश) उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो. ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही.