सिग्नल - लघुकथा
लेखनप्रकार
सिग्नल पडला तशी त्याने बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवली.त्याच्या मागोमाग एक दोन बाईक्स येउन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच थांबल्या. पण 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' प्रमाणे जसं वेळ जात होता तसं येणारी वाहणं क्रॉसिंग पार करत होती. एका काकांनी त्याच्या उजव्या बाजूने जाऊन त्याच्या समोरच बाईक लावली.एक मुलगी, ती आली तिथून तिला उजवीकडे वळण शक्य नसल्याने डाव्याबाजूला वळून झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येउन थांबली. अस करत अर्धे अधिक लोक झेब्रा क्रॉसिंग वर आले. त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली.
ह्या लोकांना नियम पाळायला काय होतं? जे कोण अधिकारी लोकं असतील त्यांना हि ह्या सगळ्या बद्दल काहीच वाटत नाही का? एवढी लोकसंख्या,बेकारी आहे . मानसं घ्या आणि लावाना कामाला, करा दंड वसूल, तोच त्यांचा पगार. कोणी एखादा तरी अधिकारी आहे का? ज्याने नियमाबद्दल एखाद्या भागामध्ये, शहरामध्ये वचक ठेवलाय त्याने मनाशीच पडताळून पाहिलं. पण कोणी आढळला नाही. नशीब त्याला वाहतुकीचे काटेकोर नियम पाळणाऱ्या एक, दोन व्यक्ती तरी ठावूक होत्या.
विचारात असतानाच त्याने पहिलं कि सिग्नल सुटायला ८,९ सेकंद राहिलेत. पुढच्या एक दोन गाड्या निघाल्या. अन त्यानंही बाईक चालू करून गेअर टाकले.
वाचने
3273
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खरं, हे असले ७-८ सेकंद आधीच
लघुकथा ??
In reply to लघुकथा ?? by सस्नेह
हो गं
In reply to हो गं by दिपक.कुवेत
हह्हह्हाहाअहाहाहाहाहाहाहाहाहा
"मामा" राहिले की...ते
अगदी बरोबर.
In reply to अगदी बरोबर. by वेल्लाभट
धन्यवाद, पुढे लक्ष्यात ठेवतो.
In reply to अगदी बरोबर. by वेल्लाभट
शेवटी कितीही झाले तरीही
:-(
In reply to :-( by आतिवास
अतिवास ताई, काही लोकं असे
In reply to अतिवास ताई, काही लोकं असे by विशाल चंदाले
>>मला हे स्पष्टीकरण द्यावं
In reply to >>मला हे स्पष्टीकरण द्यावं by सूड
'क्षमस्व' वगैरे नाही हो, मला
दुसर्याने केला आहे म्हणून