Skip to main content

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?

फरसाण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच... लहान थोर सा-यानाच तो आवडतो.. फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई..

पेट्रोलपंपवाल्यांची चालुगिरी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपूर्वी पौड रोड,पुणे (दशभुजा गणपती ते चांदणी चौकापर्यंत) येथील एकमेव पेट्रोलपंप श्रीमती अनघा घैसास या धाडसी महिलेने केलेल्या तक्रारीमुळे बंद पडला.अजुनही तो बंदच आहे. अनघा यांनी आपल्या कारमध्ये पेट्रोल भरले आणि त्यात हातचलाखी केल्याचा त्यांना संशय आला. केवळ तिथल्या कर्मचार्‍यांशी वाद घालुन न थांबता त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनी व पोलिसांकडे तक्रार केली. ईतकेच नाही तर त्याचा पाठ्पुरावा केला आणि पंप बंद करण्यात यश मिळवले.त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही आल्या असतील किंवा अजुनही येत असतील.

मी लोकलयात्री

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

गम्मत (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली.

मी, ग्रेस आणि १० रुपये

लेखक शरद यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मी, ग्रेस आणि दहा रुपये काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो ४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे.

स्वप्न - सत्य की मनाचे अद्भुत खेळ ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचं मन हा प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. मन नक्की कुठं असतं हे सुद्धा अजून स्पष्टपणे कळलेलं नाही. तो शरीराचा अवयव आहे की नुसती कल्पना हेच एक मोठे गौडबंगाल आहे. 'माझ्या मनात विचार आला' म्हणजे नक्की काय झालं ते मलाही सांगता येणार नाही पण माझं अख्खं आयुष्यच त्यावर अवलंबून असतं . मी इतरांशी कसा वागलो,वागतोय आणि इथून पुढे वागणार हे तिथेच ठरतं. मन म्हणजे काहीसं धुक्यात हरवलेला लोहगडाच्या विंचूकाट्यासारखं… ते तिथे आहे हे पक्कं माहित असतं पण धुक्यामुळे कायम अस्पष्ट आणि संदिग्ध…. तसंच त्याला पूरक म्हणून दुसरं एक स्वतःच असं एक जग दिलंय माणसाला निसर्गाने ….

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते.

नथ........भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

पत्र

लेखक अजब यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्याव