मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली.

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

बहुगुणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप.

चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

पगला गजोधर ·
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला. खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.

अंधार-क्षण - उपोद्घात (लेख १)

बोका-ए-आझम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधारक्षण - उपोद्घात नाझींनी निःशस्त्र बायका आणि लहान मुलांवर गोळ्या कशा झाडल्या असतील? जपानी सैनिकांनी एवढ्या भयावह प्रमाणावर बलात्कार आणि हत्या कशा केल्या? नाझी मृत्युछावणीत लोक नक्की कशाच्या आधारावर जिवंत राहिले असतील? जवळजवळ २० वर्षे मी ह्या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचसाठी मी दुस-या महायुद्धात या ना त्या प्रकारे  सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांना भेटलो. मला अत्याचार करणा-या लोकांना भेटण्यात आणि त्यांचं तर्कशास्त्र जाणून घेण्यात जास्त रस होता.

सोराक

दिपक.कुवेत ·
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा.

सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग

वेल्लाभट ·
नमस्कार, सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत.

झक मारली का?

योगी९०० ·
नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले.. "उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?" लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली.

ते काळे अभद्र आभाळ …।

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
[अशी म्हातारी माणसे दिसतात . आज सकाळीच बघितली जोडी . वाचनालयात आणि हळू हळू घराकडे परतताना .नव्वदीच्या तरुणाचे ते लुकलुकनारे डोळे बघून ,आणि त्या पंच्याशी वय असलेल्या गम्भीर स्त्री कडे जिच्या हातात एक पुस्तक होते पानगळ सुरु आहे ह्या पानावरून चालत असताना हे सुचून गेले ] तिचा नव्वद वर्षाचा नवरा तिच्या पंच्याशी वर्षाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेऊन चालत असतो तेव्हा तो नसतोच नव्वद वर्षाचा त्याच्या अधू डोळ्यांना नाहीच दिसत तिचे थकून गेलेलं नि लोंबणारे, ओघळलेले शरीर ….

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.