Skip to main content

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

लेखक अजब यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

शिआयडी गंमत

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा. पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द. मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा. अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द. अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?

अ‍ॅन्ड्रॉइड फोन साठी चांगले छान अ‍ॅप्स कुठे डाउनलोड करता येतील

लेखक गुल-फिशानी यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो बरेच दिवसांची हौस पुर्ण झाली आहे. मी एक सॅमसंग चा मोबाइल खरेदी केलेला आहे. मला चांगली अ‍ॅप्स कुठे डाउनलोड म्हणजे नेटवर कुठे चांगली अ‍ॅप्स डाउनलोड करावयास मिळतील याच्या लिंका कृपया द्याव्यात. आणि अ‍ॅप चा वापर कशासाठी आहे त्याची ही माहीती दिली तर बरे होइल. खास करुन संगीता विषयी चे अ‍ॅप्स असल्यास वा इतर कुठलेही अ‍ॅप्स जे इंटरेस्टींग आहेत त्यांच्या कृपया लिंका द्याव्या धन्यवाद अगोदरच मानतो

माहिती हवी आहे - प्रपौत्र दर्शन

लेखक स्वप्नालीसा यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळ पाव वर लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे. पण रोज न चुकता इथे येऊन नवनवीन लेख, चर्चा वाचण्याचा माझा अगदी नेम झाला आहे, आणि त्यातूनच मला असा वाटले कि इथले सभासद मला 'प्रपौत्र दर्शन ' सोहळ्याविषयी काही मार्गदर्शन करू शकतील आम्ही इंग्लंड मध्ये राहतो आणि इथे आमच्या एका स्नेह्यांना त्यांच्या आई आणि नाती साठी हा सोहळा करायचा आहे. त्यांच्या कुटुंबातील असा पहिलाच सोहळा अहे. बऱ्याच लोकांकडे चौकशी केल्यावर खूपच वेगवेगळी माहिती मिळाली . त्यात फक्त 'सोन्याची फुले' तेव्हढी सगळ्यांनीच सांगितली .

<दबंग>

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

विंचू चावला

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार आलं सरकार , तयाला माझा नमस्कार अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला आर आर आबा , बा .....

मातृत्त्व लांबवणे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही म्हणा आज एका बातमीने लक्ष वेधून घेतलं... त्याचा नेमका अर्थ मात्र कळला नाही. यात असं म्हटलंय... मूल जन्माला घालणे लांबणीवर टाकून जैविक घड्याळाकडे दुर्लक्ष करत करिअरवर लक्ष केंद्रित करणे या महिलांना शक्य होणार आहे. आणि यासाठी अ‍ॅपल फेसबुक या कंपन्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. पण हे असं लांबणीवर कसं काय टाकता येइल आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय. मुलाच्या वडिलांचे काय इ.

" पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र"

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
विदर्भाचे जौ द्या.. तो तर एक अर्वाचीन प्रश्न आहे आणि मिपावरील चर्चा पाहल्यास नवराज्यकर्त्याना हा प्रश सोडविण्याच्या अनेक टिप्स मिळतील. त्यामुळे हा प्रश्न आता चुटकी सरशी सुटेल असा विश्वास वाटतो. पण त्यानिमित्ताने " पुणे " नावाचे एक स्वतंत्र "राष्ट्र" असावे असा प्रस्ताव मांडतो. वास्तविक हा प्रस्ताव तसा फार प्राचीन ! किती प्राचीन ते वल्लीशेट ना विचारा , किमान " वाकाट्क" काळ तरी असेल , पण मुद्दा तो नाही , स्वतंत्र पुण्याचा आहे ! - पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक दरी प्रचंड खोल आणि रुंद ही आहे.

मदत? (शतशब्द कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांकीरीच्या जंगलात महाराज सिंहनासिकेतू येरझा-या घालीत होते. इथे ते सुरक्षीत होते. पण क्रूरकर्मा चकलासूर राजधानीत निरपराध लोकांना मारून टाकीत असतांना आपल्याला एकटे लपून रहावे लागत आहे! कोणाची मदत मिळेल? महाराजांनी अमात्य सौव्रतांना विचारले- “ आपणाला कोण मदत देईल? “ अमात्य उत्तरले- “महाराज, जनता म्हणतेय, पश्चिमेच्या सामकोकेंद्र राजांकडे मदत मागावी. त्यांच्याकडे सामर्थ्यवान वायुयाने आहेत. ते चकलासुराला सहज पराजित करू शकतील.” “जनता मूर्ख आहे अमात्य! चकलासूर निदान जनतेला मृत्यू तरी देत आहे. सामकोकेंद्र वायुयानातून रासायनीक गोळाफ़ेक करून निरपराधांना मरणापेक्षाही भयानक यातना देईल.

अंधार क्षण भाग १ - अाॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 16/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - आॅस्कर ग्रोएनिंग (लेख ४) माझ्या कामामुळे मी अनेक प्रकारच्या लोकांना भेटलो, अजूनही भेटतो. एक गोष्ट मी अगदी खात्रीलायक रीत्या सांगू शकतो की लोकांविषयी तुमच्या मनात असलेले विचार आणि प्रत्यक्ष तुम्हाला भेटणारा माणूस यांच्यात फार क्वचित काही साधर्म्य असतं. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला अशी पार्श्वभूमी दिली की - ह्या माणसाने नाझींची कुप्रसिद्ध मृत्युछावणी आॅशविट्झमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून तो नाझींचा समर्थक होता, युद्ध चालू झाल्यावर तो एस्.एस्.