शिआयडी गंमत
लेखनप्रकार
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन
मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको
अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा.
पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय
दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द.
मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा.
अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द.
अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा
म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे? - द
अहो, तुमचा जीव घ्याचा प्लान करते मी असे वाटत नाही ना तुम्हाला? - दबा
हो, तशीच शंका येत आहे, मगापासून.. तू डोके सोडून माझा गळा दाबत आहेस बये..... - द
अग्ग्गो...बाई..चुकलेच माझे! सीआयडी परत नीट बघून अभ्यास करायला हवा.. -दबा
त्यांनी आज एका टीव्ही रिमोट वापरून जग मुंबई वाचवली.. मला तो रिमोट हवा, मी शिकवेन रामाला धडा- द
गप्प रे मेल्या, म्हणे शिकवेन रामाला धडा, आधी वाचायला आणि बघायला शिक.. तो टीव्हीचा नव्हता.. एसीचा होता रिमोट - दबा
अगं, पण तू पाहिले का नाय, तो दया कसे दरवाजे तोडतो.. धडाधड.. - द
त्याला म्हणावे, माजा घराचा दरवाजा तोड! - दबा
का? तोडलं कि तो आरामात.. - द
अरे हाड.. आपला दरवाजा आत नाही उघडत, सगळे दरवाजे बाहेर... बसं म्हणावे मुसंडी मारत..- दबा
:D
वाचने
4839
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
"अरे हाड.. आपला दरवाजा आत
In reply to "अरे हाड.. आपला दरवाजा आत by रामपुरी
हेचं म्हणतो
+1
(No subject)
शायडी पेक्षा एक भारी सीरियल आहे...
In reply to शायडी पेक्षा एक भारी सीरियल आहे... by माम्लेदारचा पन्खा
रिक्शाचे पण पैसे नसतील
In reply to शायडी पेक्षा एक भारी सीरियल आहे... by माम्लेदारचा पन्खा
अग्गगगा!!!!
माप
हाहाहा!
चायला ते गोख्ले गृहोद्योग,
In reply to चायला ते गोख्ले गृहोद्योग, by कॅप्टन जॅक स्पॅरो
देवा, तुम्ही हे सर्व पाहता
In reply to देवा, तुम्ही हे सर्व पाहता by दशानन
सहनशक्तीची कमाल आहे
In reply to देवा, तुम्ही हे सर्व पाहता by दशानन
पाहत नाही. घरामधे चालु अस्तं
विंग्रजी सीरियल्स पहा. खरंच
In reply to विंग्रजी सीरियल्स पहा. खरंच by बोका-ए-आझम
सहमत.
In reply to सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
द बिग बंग थिअरी राहीली की
In reply to द बिग बंग थिअरी राहीली की by टवाळ कार्टा
यादी बरीच मोठी आहे. पेनी ची
In reply to यादी बरीच मोठी आहे. पेनी ची by कॅप्टन जॅक स्पॅरो
तीची "हेअरस्टाईल" कधीपासून
(No subject)