दिवाळीचे फटाके !
(वाघाच्या गुहेतला एक सीन)
धाकटे राजे (बात्तीसाव्यांदा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?"
थोरले राजे: "थोडी वाट पहा अजून"
धाकटे राजे (स्वतःशीच पुटपुटत): "पंधरा वर्षे झाली, लहान असल्यापासून लाल दिव्याची वाटच पाहतो आहे … "
थोरले राजे: "काय म्हणालास?"
धाकटे राजे: "काही नाही. दुपारी आमदारांना काय सांगायचं मग?"
थोरले राजे: "त्यांना काय कळतंय, सगळे निर्णय मीच घेणार"
धाकटे राजे: "मग सुभाषला का पाठवायचं?"
थोरले राजे: "तुला काहीच कळत नाही. अरे त्याच्याकडे दोन अग्रलेख तयार आहेत. आपल्या मनासारखी खाती मिळतील तर महाराष्ट्रात शिवशाही अवतरण्यासाठी तडजोड करणे भाग आहे वगैरे वगैरे आणि नाही मिळाली तर अफजलखान वगैरे नेहेमीचे आहेच. आणि ही सुभाषची मते आहेत असे म्हणायला तू रिकामा आहेस"
धाकटे राजे: "बाबा, पण ते माथुर तर न्यूजवाल्यांना म्हणाले की आम्हीच मोठा भाऊ"
थोरले राजे: "हे भावाचं काय काढलंस, तो कृष्णकुंजवाला माझा भाऊच ना तरी पण …"
थोरल्या राजांनी इथे मध्ये एक पाँज घेतला. मग राजांचा मूड सुधारण्यासाठी धाकटे राजे घाईघाईने म्हणाले.
धाकटे राजे: "तो दगाबाज नारर्या आपटला शेवटी"
थोरले राजे (स्वतःशीच): "तरीही त्यानं पोराची सोय लावलीच ना … आणि इथे याला अजून काहीच कळत नाही"
धाकटे राजे (पुन्हा): "बाबा, मग लावू का त्या माथुरला फोन?"
------
(बारामती होस्टेलवर)
(तो कपाटातला खंजीर कुठे दिसत नाही, त्याच्या शोधात सर्व कर्मचारी दंग आणि एका गुप्त दालनात)
बाळराजे: "पण काका, मला एकदा विचारायचं तुम्ही. ताई आणि मी कुणी बाहेरचे आहोत का? त्या प्रफुल्लला दिल्लीत मंत्र्याचा बंगला हवा आहे म्हणून तो तुम्हाला काहीही सल्ले देतो."
काका: "मी आहे म्हणून वाचलास, नाही तर आली होती तुरुंगात जाण्याची पाळी."
बाळराजे: "काका, तुमच्याकडून काहीच शिकलो नाही की काय आम्ही. पुरावे मागे ठेवायला मी काय ***** आहे काय? आहो त्या आगीत सगळ्या फायली जळल्या. बाकी मी आपल्या विहीरीत फेकून दिल्या"
काका: " अरे त्या पृथ्वीनं आधीच आपल्या आयपँडवर सगळी महत्वाची पाने स्कॅन करून ठेवली आहेत. उगीच नाही तो परदेशात शिकून इंजिनियर बनला"
बाळराजे: "तिच्या**** आत्ता पाठवतो दहा लोक आणि आणू उचलून तो आयपँड. तसाही जेलला आपण घाबरत नाही."
काका: "आता गप बसून राहा. मोदीकाकांचा फोन येणार आहे. तो आल्यावर मग पाहू"
------
(नागपूरच्या एका वाड्यात गावाकडचे दोन आमदार)
एक: "सगळी तिकिटे पाठवली नक्की?"
दुसरा: "शंभर टक्के. दुपारला आपले लोक येणार म्हंजे येणार"
एक: "त्या बामणाला अजाबात पत्ता लागू द्यायचा नाही. शी. यम. आपलाच झाला पायजेल"
दुसरा: "मग आपलं भाऊ डायरेक मोदीला तसं सांगत का नाय?"
एक: "आरं येडा की काय तू. ज्याच्या मनगटात जोर तो शी. यम. मग त्याला मोदीतरी कसा नाय म्हनल?"
------
(दोन फुल एक हाफ या तंबी दुराई स्टाईल मध्ये लिहिण्याचा माझा एक प्रयत्न. शब्द माझे, शैली त्यांची)
-----
वाचने
4852
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मस्त...
झ - का - स !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring planमस्त लेख
मस्त
मस्त.आवडल
आम्हि पुणेकर "फटाकडे उडवले"
In reply to आम्हि पुणेकर "फटाकडे उडवले" by अविनाशकुलकर्णी
नाय ब्वॉ तसं काही नसतं. असं
In reply to नाय ब्वॉ तसं काही नसतं. असं by पाषाणभेद
अकुंना या धाग्यावर फटाके
मस्तं!
मस्त आवडला
हा हा हा, भारी.
भारि. जम्लय
मस्त !! आवडलं !!
झक्कास आणि खुसखुशीत लेख.
खुमासदार, आवडले,
लय भारी.