Skip to main content

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 03/02/2015 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. सगळे आनंदानी ओरडायचे:- "अग्नि नारायण भगवान की...........................जय!" पुढे चालू... ============================ आणि मग ते घमेलं यजमान पत्नी कडून पूजन करून घेऊन, अग्निमुख नावाचा यज्ञपूर्व होमंसंस्कार सुरु झाल्यावर कुंडात मध्यभागी ओतल जायचं. बास्स! आणि एकदा का हा मेनपॉइंट ऑफ दि गेम नीट झाला,की मग..माझी आणि सुर्‍याची चक्र फिरायला सुरवात व्हायची. मग होमकुंडाभोवती सर्वत्र आसने लावणे. त्यां'समोर यज्ञाची हविर्द्रव्य (आहुतींचे पदार्थ) नीट लाऊन ठेवणे.

एक विचार

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 02/02/2015 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी जेवणाच्या वेळी घरीच होते. मुलींच ताट मीच वाढून दिल. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी; उजवीकडे एक भाजी, वाटीत आमटी, ताक, पोळ्या आणि मग गरम गरम वरण-भात दोघी अगदी मनापासून जेवल्या. आमच्याकड़े कामाला येणा-या बाई सगळ बघत होत्या. मला म्हणाल्या,"वाहिनी, अस रोज वाढून द्या. बघा मुलींची तब्बेत कशी महिन्याभरात सुधारेल." मी हसले; म्हणाले,"अहो, कस शक्य आहे? मग माझी बाहेरची कामं, जवाबदा-या कोण पूर्ण करणार?" मी आणि बाई दोघी हसलो आणि विषय तिथेच संपला. मात्र विषय संपला अस मला वाटल तरी विचार मनात घोळत राहिले. आता तो काळ मागे पडला..

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

लेखक म्हया बिलंदर यांनी सोमवार, 02/02/2015 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी जी काही खाली माहिती देत आहे ती अधिकृत शासकीय माहिती समजू नये. योजनेचे नाव "राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना"(सोयीसाठी "रा. गां. योजना"). हि योजना महाराष्ट्रातील नागरिकांचा विनामुल्य आरोग्य विमा आहे असं थोडक्यात म्हणता येईल. आणि योजना म्हंटलं कि अटी आल्या. प्रस्तावना १> योजना पूर्वी म्हणजे २ जुलै २०१२ ला प्रायोगिक तत्वावर केवळ ८ जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. याला Phase - I म्हणतात.

चित्रफीत सुधारणे बाबत.

लेखक जानु यांनी सोमवार, 02/02/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा करांना मी विनंती करतो की मला माझ्या जवळील काही महत्वाच्या चित्रफिती सुधारणा करुन हव्या आहेत. मुळ चित्रफीत सी.सी.टी.व्ही. च्या कॅमेरामधील आहे. ९०० टी.व्ही.एल. मला त्यांचा मुळ फॉरमॅट सुध्दा ईतर प्लेअर मध्ये दिसत नाही. तो देखील बदलुन पाहिजे. मुळ चित्रफितीची क्वालीटी वाढवुन किंवा त्या अधिक चांगल्या करुन हव्या आहेत. आपल्या माहितीमध्ये जर हे काम व्यावसायिक पणे करणारे व्यक्ती किंवा संस्था असेल तर मला ती द्यावी.

दोघी ……!

लेखक फिझा यांनी सोमवार, 02/02/2015 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ……! भाग १ रविवार सकाळ . फक्त आणि फक्त आराम करायची वेळ ! एखादी गझल ऐकायची किंवा आशा, लता आणि किशोर यांची बहारदार गाणी ! उडप्या कडून मस्त इडली सांबार मागवायचे , दुपारी एखादा मुव्ही पाहायचा ,संध्याकाळी नदीवर फिरायला जायचे ……असा परफेक्ट रविवार ! आणि आपला जोडीदार आपल्याबरोबर असेल तर आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक क्षण…… असा परफेक्ट ! जोडीदार …लाइफ़ पार्टनर ! ज्याच्याबरोबर आयुष्यातल्या प्रत्येक सुखाची कल्पना केलेली असते तोच ! आयुष्यात सुखाबरोबर दुख्ख हे असणारच पण त्यात खंबीरपणे आपल्याबरोबर उभा राहून साथ देईल ….

कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य

लेखक सतीश कुडतरकर यांनी सोमवार, 02/02/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य
From Kokankada 2006
पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट

देश कसा बुडवावा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 02/02/2015 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे देशभक्ती आचरटपणा आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली की सैन्यदलांना नावे ठेव जाब विचार, साधे स्मगलर हो ते दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली? बघ, देश बुडतो की नाही आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक, दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार, काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना? बघ, देश बुडतो की नाही एकदा कुणीतरी सिनेमा काढेल देवळात जाणार्यांना मूर्खात काढेल पण तू मात्र त्याचा उदो

महागाईचे कारण

लेखक देवांग यांनी सोमवार, 02/02/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस शिक्षकांनी वर्गात सांगितले कि उद्या तुमच्या वर्गाचा ग्रुप फोटो काढायचा आहे तरी सर्वांनी प्रत्येकी ५० रुपये फोटोसाठी आणावेत त्याच वर्गात आपला बाळ्या पण होता, ज्याला लहानपणीच नेता बनायचं किडा चावला होता ...आणि तोच सर्व वर्गाचा नेता होता. जशी त्याने हि सूचना ऐकली ...तशी तास संपल्यावर रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांना म्हणाला कि "हि तर खुली लुट आहे...हे शिक्षक हि शाळा आपल्याला अशीच लुटत राहणार ...मला सांगा कि फोटो प्रिंटआउटला ५० रुपये लागतात का ?...प्रिंटआउट १० रुपयात मिळते ....हि शाळा आपले सर्व शिक्षक राहिलेले ४० रुपये आपआपसात वाटून घेणार.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/02/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
a (पुस्तक-परिचय ) शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.