प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे कधीच नसते सुचले उत्तर
प्रश्न असा की ज्या प्रश्नाचे प्रश्नातच दडलेले उत्तर..
प्रश्न असा की मनात येता डोळे अलगद भरून यावे
दुखरे आणिक हळवे उत्तर अश्रूंमध्ये वाहून जावे..
प्रश्न असा की सात्विक, दाहक, तेजस्वी कृष्णेसम कणखर
प्रभेत त्या प्रश्नाच्या व्हावे द्रोण, भीष्म अन कृपही निरुत्तर..
प्रश्न असा की रुढींचा मृत सागर त्याने ढवळून जावा
सत्य शुद्ध अन मांगल्याचा अभंग त्यातून तरून यावा..
प्रश्न असा की विश्वाच्या गर्भाला त्याने स्पर्शून जावे
उत्तर त्याचे शोधू जाता सिद्धार्थांचे गौतम व्हावे..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2664
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
सुरेख रचना.आवडली कविता.
रचना आवडली.
मस्तच वेगळीच रचना
आवडली
सुंदर
सुरेख!
प्रश्न असा की रुढींचा मृत
सुन्दर
धन्यवाद!!
प्रश्न असा की रुढींचा मृत
कवीची वेगळी कल्पना म्हणुन
In reply to प्रश्न असा की रुढींचा मृत by गणेशा
:):):) धन्यवाद!!